<div class="paragraphs"><p>दाबोळी मतदार संघातील नवेवाडेत आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) परिवर्तन यात्रेला बोलताना उपाध्यक्ष प्रेमानंद नानोस्कर, बाजुस राजदिप नायक, ॲड. अमित पालेकर.</p></div>

दाबोळी मतदार संघातील नवेवाडेत आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) परिवर्तन यात्रेला बोलताना उपाध्यक्ष प्रेमानंद नानोस्कर, बाजुस राजदिप नायक, ॲड. अमित पालेकर.

 
Dainik Gomantak
गोवा

येणाऱ्या निवडणुकीत दाबोळी परिवर्तन घडविण्यास सज्ज: प्रेमानंद नानोस्ककर

दैनिक गोमन्तक

दाबोळी: दाबोळीतील नवेवाडे भागाला स्थानिक लोकप्रतिनिधींनी विकास कामाबरोबर युवकांना नोकरीपासून वंचित ठेवले आहे. यामुळे दाबोळी (Daboli) मतदार संघ दहा वर्षे मागे राहिला आहे. आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दाबोळीतून परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज झाला असल्याची माहिती गोवा राज्य आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष प्रेमानंद (बाबू) नानोस्ककर (Premanand Nanoskar) यांनी दिली.

गोव्यात आम आदमी पक्षाची परिवर्तन यात्रा दाबोळी येथील नवेवाडे येथील शेवटच्या बसस्थानकावरून मोठी जनसभा घेऊन सुरुवात करण्यात आली. यावेळी आपचे उपाध्यक्ष प्रेमानंद नानोस्कर, राजदीप नायक, नानू नाईक, ॲड. अमित पालेकर सरफराज अनकलगी, शेख नूहा, सलमा कमालशा, नजमुद्दिन निसार, सातान कुरैया, सुशीला, शाहिद शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.

परिवर्तन यात्रेच्या सभेला संबोधित करताना नानोस्कर म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्व गोव्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज झाले आहे. यात गोव्यातील सर्व धर्मीय जनतेच्या सहकार्याने गोव्यात आप यश संपादन करणार आहे. दाबोळीत नवेवाडे भागात मी नगरसेवक असताना आणलेली कामे तेवढीच नजरेस पडत आहेत. संपूर्ण दाबोळीत गटार प्रकल्प अजूनही आणण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरले आहे. जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधीला यापुढे दाबोळीतील जनता योग्य धडा शिकवतील अशी माहिती प्रेमानंद नानोस्कर यांनी दिली.

आपचे नेते राजदीप नायक यांनी सांगितले की राज्यात मोठ्या प्रकल्पाच्या नावाखाली फक्त सरकारच्या टक्केवारीवर नजर तेवढी आहे. यामुळे सरकारने कोविड महामारी जनतेला मृत्यूच्या छायेत टाकले. सरकार चांगली आरोग्य सेवा देण्यास पूर्णपणे अपयशी ठरली असल्याने यापुढे गोव्यात केजरीवाल मॉडेल आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देण्यासाठी परिवर्तन यात्रेतून मतदारांच्या दारी आला आहे. ॲड. अमित पालेकर यांनी युवकांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून भाजप सरकार युवका बरोबर त्यांच्या पालकावर अन्याय केला असल्याचा आरोप पालेकर यांनी केला. गोव्याचा युवक शिक्षित असून योग्य वेळी भाजपला त्यांची जागा दाखवणार असल्याची माहिती पालेकर यांनी दिली. गोव्यात आम आदमी पक्ष परिवर्तन घडवण्यासाठी येणारी विधानसभा निवडणुकीत अवश्य यश संपादन करणार आहे. जनता गोव्यातील काँग्रेस व भाजप सरकारला कंटाळली असून यापुढे फक्त केजरीवाल आम आदमी पक्षाच्या बाजूने राहणार असल्याची माहिती नानू नाईक यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mysterious Artefact Found In Goa: पणजीत आढळलेल्‍या मूर्तीवर करणार कार्बन प्रक्रिया : नीलेश फळदेसाई

High Tide Alert For Panaji: पणजीसाठी 22 दिवस धोक्याचे; पावसाळ्यात उसळणार 4.5 मीटरपेक्षा अधिक उंच लाटा

Vishwajit Rane On Congress: काँग्रेसने काय दिवे लावले? विश्वजीत राणेंचा घणाघात

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT