Panaji Municipal Corporation Dainik Gomantak
गोवा

पणजीतील पावसाळापूर्व कामांना मुहूर्त मिळेना...

पणजीतील नागरिकांत नाराजी: गटारे न उपसल्याने पावसाळ्यात धोका

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी महानगरपालिकेने अद्यापही पावसाळापूर्व कामांना सुरवात केलेली नाही. पाऊस अवघ्या सव्वा महिन्‍यांवर येऊन ठेपला आहे. तरीही पावसाळापूर्व कामे सुरू केली नसल्‍याने नागरिकांतून रोष व्‍यक्‍त केला जात आहे.

यासंबंधी माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांना विचारले असता ते म्‍हणाले, सर्वसाधरणपणे 5 जून रोजी पावसाला सुरवात होईल असे गृहीत धरून शहरातील पावसाळापूर्व कामांना सुरवात केली जाते. माझ्या महापौरपदाच्‍या कारकिर्दीत एप्रिल अखेर 40 टक्‍के कामांची पूर्तता झालेली असायची. शहरातील नाले, गटारे, झाडांच्‍या फांद्यांची छाटणी, रस्‍त्‍यावरील खड्डे बुजवणे आदी कामे केली जायची. पावसाळा अवघ्या महिन्‍यावर येऊन ठेपला आहे. त्‍यातच गेल्‍या पंधरा दिवसांत अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. अशावेळी शहरातील कामे सुरू करणे आवश्‍यक होते.

पणजी पालिका क्षेत्रातील एकाही प्रभागातील पावसाळापूर्व कामे झाल्‍याचे दिसून येत नाही. अधूनमधून कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक गटारे आणि नाले तुंबल्‍याचे दिसून आले. तसेच रस्‍त्‍यांवरील खड्ड्यांत पाणी साचल्‍याने किरकोळ अपघातही झाले. अनेक ठिकाणी झाडांच्‍या फांद्या रस्‍त्‍यावर पडल्‍या. काही ठिकाणी वीज वाहिन्‍यांवर पडल्‍या. यामुळे पणजीवासीयांना खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागला. पणजी महानगरपालिका प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालून पावसाळापूर्व कामे ताबडतोब सुरू करावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.दरम्‍यान, याबाबत माहिती घेण्यासाठी महापौर रोहित मोन्‍सेरात यांच्‍याशी संपर्क साधण्याचा प्रयत्‍न केला असता तो होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

SCROLL FOR NEXT