Pre-Monsoon Work in Mapusa Twitter/Joshua Peter De Souza
गोवा

Pre-Monsoon Work in Mapusa: उपसभापतींनी घेतला मॉन्सूनपूर्व कामांचा आढावा; लवकरच कामं पूर्ण होण्याचं आश्वासन

राज्यात सध्या मॉन्सूनपूर्व कामे सुरू असून पावसाळा जवळ आला तरी ही कामे पूर्ण झाली नसल्याचे चित्र आहे.

दैनिक गोमन्तक

Pre-Monsoon Work in Mapusa: राज्यात सध्या मॉन्सूनपूर्व कामे सुरू असून पावसाळा जवळ आला तरी ही कामे पूर्ण झाली नसल्याचे चित्र आहे. दरम्यान आपापल्या भागातील कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. उपसभापती आणि म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी म्हापशातील कामांचा आढावा घेतला.

यावेळी जोशुआ यांच्यासोबत WRDचे सहाय्यक अभियंता सुदेश परुळेकर, नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, प्रशांत नार्वेकर, सुभा आमोणकर, संगीता सातार्डेकर, शुभांगी वायंगणकर इ. मान्यवर उपस्थित होते.

आमदार जोशुआ डिसोझा यांनी म्हापसामधील मॉन्सूनपूर्व कामे आणि नाल्यांची पाहणी करत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच या कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केले असल्याचे जोशुआ यांनी सांगितले.

तसेच, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी सुरू असलेली कामे या आठवड्यात सुव्यवस्थित करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती यावेळी जोशुआ यांनी दिली.

दरम्यान, म्हापसा-गिरी रस्त्यावर काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर मोठे भगदाड पडले होते. मात्र त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. याकडे सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT