Land Grabbing Case
Land Grabbing Case Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case : जमीन हडप प्रकरणातील सूत्रधार सलीम दोडामणीचा अटकपूर्व जामीन नाकारला

सुशांत कुंकळयेकर

मृत झालेल्या नोटरीच्या नावे बनावट शिक्के तयार करून तसेच बनावट पॉवर ऑफ ॲटर्नी तयार करून मडगाव येथील एका वृध्द कपड्याच्या व्यापाऱ्याची दवर्ली येथील जमीन हडप करण्याचा आरोप असलेला या प्रकरणातील सूत्रधार संशयित सलीम दोडामणी याने अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज आज दक्षिण गोवा प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांनी फेटाळून लावला.

काल त्याचा दुसरा साथीदार राजदीप कुंडईकर याचा अटकपूर्व जामीनासाठीचा अर्ज न्या. आगा यांनी फेटाळून लावला होता.

मडगाव पोलीस या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात चालढकल करत असताना 'गोमंन्तक'ने या प्रकरणाला वाचा फोडल्यावर अवघ्या आठ तासात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्या नंतर हे दोन्ही संशयीत फरार झाले असून त्यांना पकडण्यासाठी मडगाव पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.

दोडामणी याच्या जामीन अर्जाला विरोध करताना मडगाव पोलीसांनी तो एक सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याला चोरीच्या प्रकरणात मायणा कुडतरी पोलीसांनी अटक केली होती तर एका वकिलाला धमकी दिल्या प्रकरणी त्याच्यावर वेर्णा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला होता याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

हे जमीन हडप प्रकरण म्हणजे सुनियोजित कट असून मृत नोटरीचे नाव वापरून कागदपत्रे कशी तयार केली गेली आणि यासाठी कुणाचा आधार घेतला गेला याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी सलीम आणि राजदीप यांना कोठडीत घेऊन त्यांची चौकशी करणे आवश्यक असल्याचे न्यायालयात सांगितले.

या संशयितांकडून जमीन खरेदी केलेले महमद इस्माईल ललनवार आणि इलियास अब्दुल धलायत या दोघांना काल अटकपूर्व जामिन मंजूर करण्यात आला होता. या प्रकरणी मडगाव पोलीसांनी मडगाव येथील एका नोटरीसह एकूण 5 जणांवर फसवणूक व अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, महमद सालेह मुसा या मडगाव येथील कपड्याच्या व्यापाऱ्याचे दवर्ली येथील दोन प्लॉट सलीम आणी राजदीप यांनी बनावट कागदपत्रे तयार करून घेऊन बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीच्या आधारे ललनवार आणि धलायत यांना विकले.

यासाठी एका मृत नोटरीच्या नावाने बोगस कागदपत्रे तयार करण्यात आली. या प्रकरणी आपल्याला अटक होईल या भितीने त्यांनी त्यांनी जामीन मिळावा यासाठी कोर्टात धाव घेतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गासाठी राज ठाकरेंचं भर सभेत मोदींकडं साकडं

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

Swati Maliwal Assault Case: 'भाजपने षड्यंत्राचा भाग म्हणून स्वाती मालीवाल यांना...', 'आप' नेत्या आतिशी यांचा घणाघात

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT