शैक्षणिक संस्थांनी आधुनिक विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपल्या शैक्षणिक संस्थांत बदल केले पाहिजे. पालक व विद्यार्थ्यांना ज्ञान मंदिराबद्दल आत्मविश्वास निर्माण होण्याच्या दृष्टीने पावले उचलल्यास संस्था नावारूपास येण्यास विलंब लागणार नाही, असे प्रतिपादन पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी लोकशिक्षण हायस्कुल धारगळच्या संस्थापक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी केले.
यावेळी धारगळचे सरपंच अनिकेत साळगावकर, अध्यक्षस्थानी लोकशिक्षण संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश धुमाळ, सचिव दिगंबर हरमलकर, खजिनदार दीपक कोलवाळकर, मुख्यध्यापिका जस्मिनी मांद्रेकर, पीटीए अध्यक्ष सिद्धेश धारगळकर, उपाध्यक्ष देविका रेवोडकर,अनिल नाईक,व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सरपंच अनिकेत साळगावकर म्हणाले की, आपल्या गावची शाळा सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज,असावी असे गावच्या लोकांबरोबर शिक्षक व विद्यार्थ्यांना वाटले पाहिजे. खासगी शाळांना अनेक अडीअडचणींना सामने देत पुढे जावे लागते. त्यासाठी गावच्या पंचायतीने किंवा प्रमुखाने त्यांना सहाय्य करणे आवश्यक आहे.
संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश धुमाळ यांनी स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवीन शाळेमध्ये प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. सूत्रसंचालन तेजश्री देसाई , पुनम महाले व श्रुती हरमलकर यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.