Praveen Zantye  Dainik gomantak
गोवा

Goa Mining: खाण प्रश्न सोडवण्यात जातीने लक्ष घालणार: प्रवीण झांट्ये

प्रवीण झांट्ये : लईराईच्या आशीर्वादाने प्रचाराला प्रारंभ

दैनिक गोमन्तक

डिचोली: शिरगावसह मये मतदारसंघ हा खाणपट्टयात येतो. खाण महामंडळ सुरु करून खाण प्रश्न सोडवणे शक्य असतानाही सरकार अपयशी ठरले. त्यामुळे कामगारांसह खाणपिडीत संकटात आले आहेत. या समस्येची आपणाला पूर्ण जाण आहे, असे मगो पक्षात (MGP) प्रवेश केलेले माजी आमदार प्रवीण झांट्ये (MLA Pravin Zantye) यांनी सांगून मगो पक्ष यात जातीने लक्ष घालणार, असे आश्वासन सेसाच्या कामगारांना दिले. प्रवीण झांट्ये यांनी कार्यकर्त्यांसह घरोघरी प्रचारावर भर दिला.(Praveen Zantye will pay attention to caste in solving mining problem)

शुक्रवारी मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीचे आशीर्वाद घेऊन प्रवीण झांट्ये यांनी जाहीर प्रचाराला सुरवात केली. या निवडणुकीत (Goa Assembly Election) आपण निवडून येणार असल्याचा विश्वासही प्रवीण झांट्ये यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासमवेत शिरगावचे माजी सरपंच राजेंद्र गावकर, मयेचे माजी सरपंच सुभाष किनळकर, पंच कृष्णा परब आणि ऊर्वी मसूरकर, विनोद गाडगीळ, डॉ. एन. सी. सावंत, सीताराम सावंत, योगेश सावंत आदी समर्थक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT