Sexual Assault Case | Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Sexual Assault Case: पोलीस असल्याचे सांगून 5 वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, आता झाली निर्दोष मुक्तता

तळपण - काणकोण येथे ही घटना घडली होती

दैनिक गोमन्तक

Sexual Assault Case : आपण पोलीस असे सांगून एका महिलेवर लैंगिक अत्‍याचार केल्‍याचा आरोप असलेल्‍या तसेच तिच्‍याकडून ६४ हजारांची रक्‍कम उकळल्‍याचा आरोप असलेल्‍या गावडोंगरी-काणकोण येथील प्रवीण गावकर याला मडगावच्‍या सत्र न्‍यायालयाने बुधवारी त्‍याच्‍यावरील आरोपातून निर्दोष मुक्‍त करण्‍याचा आदेश दिला.

काणकोण पोलिसांनी सत्र न्‍यायालयात सादर केलेल्‍या आरोपपत्रानुसार २०१७ ते २०२२ या कालावधीत तळपण - काणकोण येथे ही घटना घडली होती. आराेपपत्रानुसार आपण गोवा पोलीस खात्‍यातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई असल्‍याचे सांगून या संशयिताने या महिलेशी जवळीक साधली व त्‍यानंतर तळपण-काणकोण येथे एका खोलीत तिच्‍या संमतीविना तिच्‍यावर लैंगिक अत्‍याचार केले आणि त्‍यानंतर अश्‍‍लील फोटो काढून त्‍या माध्‍यमातून ब्‍लॅकमेल करण्‍याची धमकी दिली.

गेल्‍या पाच वर्षात या संशयिताने गोव्‍यात अनेक ठिकाणी नेऊन तिच्‍यावर लैंगिक अत्‍याचार केले आणि तिच्‍याकडून ६४,९३० रुपये उकळले, असा आरोप पोलिसांनी या संशयितावर ठेवला होता.

संशयिताने ज्‍या मोबाईलने हे फोटो काढले होते तो मोबाईल संशयिताने नष्‍ट केला आणि या कारणास्‍तव या संशयिताविरुद्ध काणकोण पोलिसांनी भादंसंच्‍या १७०, ५०६, ३७६, ३८४, ४६८, ४७१, २०१ या कलमाखाली गुन्‍हा नाेंद केला, असे न्‍यायालयात सादर केलेल्‍या आरोपपत्रात काणकोण पोलिसांनी म्‍हटलेले आहे.

निर्दोष मुक्‍तता न्‍यायालयात या खटल्‍याची सुनावणी सुरु झाली. मात्र संशयितावर असलेला आरोप सरकारपक्ष न्‍यायालयात सिद्ध करु शकला नाही. त्‍यामुळे अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश पूजा कवळेकर यांनी या प्रकरणातील संशयित आरोपी पी. गावकर याला या आरोपातून निर्दोष मुक्‍त करण्‍याचा आदेश बुधवारी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT