Prasanna Gawas elected unopposed As Mayor Of Valpoi Municipal Council  Dainik Gomantak
गोवा

Valpoi Municipal Council: वाळपई नगराध्यक्षपदी प्रसन्ना गावस यांची बिनविरोध निवड

शैहजीन शेख यांनी पदाचा राजीनामा दिल्याने पद रिक्त होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Prasanna Gawas Elected Unopposed As Mayor Of Valpoi Municipal Council: वाळपई नगराध्यक्षपदी प्रसन्ना गावस यांची सोमवारी सकाळी बिनविरोध निवड झाली. शैहजीन शेख यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर प्रसन्ना गावस यांची निवड झाली.

अलिखित करारानुसार अ़डीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद बहाल करण्यात आले होते. यानुसार 2 ऑक्टोंबर रोजी करार संपल्यानंतर शैहजीन शेख यांनी नगरपालिका संचालनालयाकडे आपला नगराध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला होता.

सोमवारी सकाळी नगरपलिका कार्यालयात सत्तरी उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली. नगरसेवक उसउद्दीन सय्यद यांनी नगराध्यक्षाचे नाव सुचवले. त्याला नगरसेवक विनोद हळदणकर यांनी अनुमोदन दिले.

यावेळी मुख्याधिकारी दशरथ गावस, शाहिझीन शेख, उपनगराध्यक्ष इद्रूस शेख, अनिल काटकर, सरफराज सय्यद, निर्मला साखळकर, रामदास शिरोडकर, शराफत खान, विनोद शिंदे आदींची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT