Prasad Gaude Dainik Gomantak
गोवा

Goa Tourist : पर्यटकांना लोकसंस्कृतीचे दर्शन घडावे: प्रसाद गावडे

Goa Tourist : : ग्रामीण जीवनशैलीवर आधारित इको टुरिझम हवे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourist : पेडणे, गोवा म्हणजे केवळ मौजमजा करण्याचे ठिकाण नसून गोव्याची जी कोकणी जीवनशैली आहे, तिचेही दर्शन घडायला हवे. आज गोवा पर्यटनाची ओळख केवळ पार्ट्या आणि किनारे अशी आहे.

या पलिकडे जाऊन निसर्गाला जपणाऱ्या येथील लोक संस्कृतीचे दर्शन घडायला हवे, असे पर्यावरणप्रेमी प्रसाद गावडे यांनी सांगितले.

नवचेतना युवक संघ व संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ''जीवन शाळा'' या विषयावर गावडे बोलत होते. यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर, प्राचार्य प्रविणा केरकर, नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, व्हायकाउंट हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र बोंद्रे, पर्यावरणप्रेमी योगेश तळवणेकर, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर आदी उपस्थित होते.

गावडे पुढे म्हणाले की, नद्या, देवराई, मंदिरे, शेती, मासेमारी, चालीरिती, कला संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी आपले प्रयत्न हवेत. ग्रामीण जीवनशैलीवर आधारित इको टुरिझम हवे. शेतकरी जीवनशैली जगून सुद्धा रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असे ते म्हणाले.

आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले की, कोकणी रानमाणूस म्हणून प्रसाद गावडे हे संपूर्ण कोकणात विविध स्तरावर काम करत आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे आणि ते टिकून ठेवण्यासाठी त्यांचे कार्य मोठे आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी.

मुख्याध्यापक राजेंद्र बोंद्रे यांनीही विचार मांडले. या व्याख्यानात व्हायकाऊंट हायस्कूल पेडणे, हुतात्मा मनोहर पेडणेकर सरकारी विद्यालय पेडणे, लोकशिक्षण हायस्कूल धारगळ, विकास हायस्कूल पेडणे, कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय कोरगाव,

सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय पेडणे व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्वागत व प्रास्ताविक कृष्णा पालयेकर यांनी केले. सूत्रसंचालन ओंकार गोवेकर यांनी केले. गौरेश पेडणेकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'मिशन 21'! शिंदेंच्या शिवसेनेचा गोव्यात 'एकला चलो रे'चा नारा; महाराष्ट्रात भाजपसोबत युती, मग गोव्यात वेगळा संसार कशासाठी?

Vyatipat Yog 2026: पैशांची चणचण अन् मानसिक संताप! सूर्य-चंद्राचा 'व्यतिपात योग' उडवणार 4 राशींची झोप; नशिबाची सुटणार साथ

FDA Inspection: अन्न सुरक्षेवर भर; 'एफडीए'कडून 29.09 लाखांचा दंड वसूल, 325 हून अधिक आस्थापनांची पाहणी

VIDEO: 'टोमणे पचवता येत नसतील तर...' यशस्वी जयस्वालच्या कृत्यावर दिग्गज क्रिकेटपटू भडकला; मैदानावरील राड्यानंतर सुनावले खडे बोल

Colvale jail: कोलवाळ जेलच्या भिंतीआड 'काळाबाजार'? कैद्यांना मद्य, अमली पदार्थ, स्मार्टफोन अन् परफ्युमचा 'स्पेशल सप्लाय'; धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT