Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

प्रमोद सावंतांचे सरकार म्हणजे फक्त दलाली, विजय सरदेसाईंचा घणाघात

प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचे गोव्यातील सरकार हे ब्रोकरांचे सरकार असून स्वतःच्या फायद्यासाठी या सरकारातील मंत्र्यांनी गोवा लिलावात काढला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचे गोव्यातील सरकार हे ब्रोकरांचे सरकार असून स्वतःच्या फायद्यासाठी या सरकारातील मंत्र्यांनी गोवा लिलावात काढला आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी आज केला. आज घोगळ येथील एका रस्त्याचे अडीज कोटी रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात येणार असून या कामाचे उदघाटन करताना त्यांनी हा आरोप केला. या नोकरभरती घोटाळ्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्या बरोबरच निवडणूक आयोगाकडे तक्रार करू असे त्यांनी सांगितले.

वास्तविक निवडणुकीच्या काळात जर कुठलेही सरकार नोकऱ्या देत असतील तर त्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याना देतो. मात्र या सरकारातील मंत्र्यांनी नोकऱ्या विकण्याचे दुकान थाटले आहे. आपल्या कार्यकर्त्याना नव्हे तर दुसऱ्या मतदारसंघातील उमेदवारांना ते नोकऱ्या विकतात असा आरोप केला. ज्या उमेदवाराकडून पैसे घेतले गेले आहेत त्यांच्या कोऱ्या प्रश्नपत्रिका घेऊन नंतर त्या भरल्या जातात असा आरोप सरदेसाई यांनी केला.

प्रमोद सावंत यांचे हे सरकार भ्रष्टाचारी जनता पार्टी सरकार हे आम्हाला पूर्वीच माहिती होते. चार महिण्यापूर्वीच मी या सरकारातील मंत्र्यांनी नोकऱ्यांचे मेन्यू कार्ड तयार केले आहे असा आरोप केला होता. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी तर प्रमोद सावंत यांच्या सरकारात प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार असल्याचे म्हटले होते. आता बाबूश मोन्सरात यांनी या सरकारला घरचा आहेर दिला आहे असे ते म्हणाले. हे सरकार निवडणूक जिंकण्यासाठी नोकऱ्यांचे वाटप करत असल्याची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे करू असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT Project Farmagudi: फर्मागुढी 'आयआयटी'ला विरोधासाठी विरोध नको! देवस्थानला धक्का लागणार नाही;CM प्रमोद सावंताचे स्पष्टीकरण

Goa Politics: राजकारणात खळबळ! सासष्टीतील मतं फोडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची तरतूद; गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

Horoscope: महिन्याच्या शेवटच्या दिवशी 'या' 4 राशींचे नशीब चमकणार; करिअर, व्यवसायात मोठ्या यशाचे संकेत

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

SCROLL FOR NEXT