Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

प्रमोद सावंत होळीनंतर घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत घेतली भेट

दैनिक गोमन्तक

गोवा: गोव्याचे काळजीवाहू-मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मणिपूरचे काळजीवाहू-मुख्यमंत्री एन बिरेन सिंग हे तसेच गोवा भाजपचे नेते आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी संसदेत दाखल झाले आहेत. गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून ते होळीनंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती ट्वीटरद्वारे सांगितली. (Pramod Sawant will take oath as CM of goa after Holi)

"आमचा पक्ष गोव्यातील जनतेचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला पुन्हा राज्याची सेवा करण्याचा जनादेश देऊन आशीर्वाद दिला. आम्ही आगामी काळात गोव्याच्या प्रगतीसाठी काम करत राहू," असे ट्विट पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) केले.

राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांची भेट घेण्यासाठी काल दिल्लीला रवाना झाले असून आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी संसदेत दाखल झाले.

गोवा राज्याच्या आठव्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला काल 39 नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसह सुरुवात झाली.

गोव्‍यात पक्षांतर्गत वाद वाढत असल्याची माहिती होती

दरम्यान, गोव्‍यात (Goa) पक्षांतर्गत वाद वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात नेता निवडीबाबतही मतभेद असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे असल्याने राज्यपालांनी अधिकाराचा योग्य वापर करत हे अधिवेशन बोलाविले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT