Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

प्रमोद सावंत भाषणाच्या सुरुवातीलाचं झाले भावनाविवश

गेल्या 50 वर्षात झाला नाही तो विकास गेल्या दहा वर्षात झाला; प्रमोद सावंत

दैनिक गोमन्तक

साखळीतील लोकांना केवळ आमदारच नव्हे तर मुख्यमंत्रीही निवडूनआणायचा आहे. भाजपचे बावीस प्लस पुर्ण बहुमत द्या. डॉ.प्रमोद सावंत मुख्यमंत्री बनल्यानंतर सहा महिन्यात गोव्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरु करु तसेच 2015 पर्यत गोवा हे "स्टार्ट अप" साठी केंद्र बनवू असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी साखळी येथे दिले. यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) म्हणाले आपल्या भाषणातील सुरुवातीला थोडे भावनावश झाले.

सन 2012 व 2017 स्व.मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) मला निवडून आणण्याचे आवाहन करण्यासाठी साखळीत आले होते. आज ते हयात नाहीत यावेळी मला जिंकण्याचे आवाहन करण्यासाठी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले आहेत. सभेतील उपस्थिती पाहता आपण मला पुन्हा निवडणार हे निश्चित. आपल्या सरकारच्या काळात अनेक नैसर्गिक संकटे आली तरीही न डगमगता सर्व संकटांना तोंड देत आपण कार्य केले.

माझ्या कार्यकर्त्यांमुळेच आपण आमदार, सभापती व मुख्यमंत्री बनलो. असे सांगून मुख्यमंत्र्यांनी नतमस्तक होऊन उपकार मानले. तसेच आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांला मुख्यमंत्री केलेल्या तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व आताचे गृहमंत्री अमित शाह यांनाही मुख्यमंत्र्यांनी वाकून नमस्कार केला. कुणी स्वप्नातही चितले नव्हते की मी आमदार होणार पण त्यापुढेही आपण सभापती व मुख्यमंत्री बनलो.

पार्टीने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या मी चोखरित्या पार पाडल्या आहेत आता मला पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी तुमची आहे. साखळी (Sanquelim) मतदार संघाच्या विकासाच्या बाबतीत कुठेच कमी पडलो नाही. गेल्या 50 वर्षात झाला नाही तो विकास गेल्या दहा वर्षात झाला. केंद्र व राज्य सरकारच्या शेकडो योजना भाजप सरकारने सुरु केल्या आहेत. पुढील पाच वर्षात खाजगी क्षेत्रात 30 हजार रोजगार देऊ.

मगोच्या सुदीन ढवळीकर विरोधात टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले ढवळीकर हे स्वता आपल्या मतदार संघात निवडून येत नसल्याने इतर भागात जाऊन ढवळाढवळ करीत आहेत. तृणमुल बरोबर अभद्र युती मगोला बुडवणार या निवडणूकीत (Election) बुडवणार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले पर्रीकरांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य प्रमोद सावंत चोख बजावत आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोविड काळात अतिशय कुशल पध्दतीने प्रशासन हाताळले. मुख्यमंत्री (CM) स्वता भरपूर वेळ देऊन संपुर्ण राज्यासाठी काम करत आहे. भविष्यात रोजगार, भागराळे गोय करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी पुन्हा एकदा डॉ प्रमोद सावंत यांना निवडून द्या व मुख्यमंत्री बनवा असे आवाहन केले.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, भाजप (BJP) महिला मोर्चाच्या प्रभारी सुलक्षणा सावंत, स्वाती मायणीकर यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्दी पोरोब व आभार प्रदर्शन कालिदास गावस यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT