Prabhakar Gawkar and Anthony Barboza demanded that Quepem MLA Altone D'Costa apologize to the ST community Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'डिकॉस्ता यांनी संपूर्ण एसटी समाजाची माफी मागावी...'; प्रभाकर गावकर आणि अँथनी बार्बोजा आक्रमक

Goa Assembly: एसटी मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर व उपाध्यक्ष अँथनी बार्बोजा यांनी मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

Manish Jadhav

केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी एसटी आरक्षण ठरावावरुन सभापती रमेश तवडकर यांच्यावर टीका करुन फक्त सभापतींचाच अपमान केला नाही तर संपूर्ण एसटी समाजाचा अपमान केला, त्यामुळे त्यांनी केवळ सभापतींचीच नव्हे तर संपूर्ण एसटी समाजाची माफी मागावी अशी मागणी भाजप एसटी मोर्चातर्फे करण्यात आली.

एसटी मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर व उपाध्यक्ष अँथनी बार्बोजा यांनी मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी बोलताना गावकर यांनी सभापती हे घटनादत्त पद असून ते निष्पक्ष असतात असे असताना त्यांना भाजपचा एजंट म्हणणे ही फार मोठी चूक आहे असा दावा केला.

तर बार्बोजा यांनी 2023 मध्ये आमदार गणेश गावकर यांनी हा ठराव आणला होता आणि त्यावेळी सभागृहाने तो एकमताने मान्य केला होता त्यामुळे हा ठराव परत मांडण्याचे काहीच प्रयोजन नव्हते, असे सांगितले. डिकॉस्ता यांनी एका मुलाखतीत आपल्याला चिल्लर म्हटले आणि कुडतरीत एसटीचे 12 हजार मतदार असताना मला फक्त दीड हजार मतेच मिळाली असे म्हटले होते.

प्रत्यक्षात मला दीड हजार नव्हे तर जवळपास अडीच हजार मते मिळाली होती. मात्र कुडतरी हा परंपरेने काँग्रेस बरोबर राहणारा मतदारसंघ असताना मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला 4 हजार मतेही कशी पडू शकली नाहीत असा सवाल त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT