Sudin Dhavalikar Dainik Gomantak 
गोवा

'मांद्रेतील वीजउपकेंद्रासाठी 50 कोटींचा खर्च येणार'

सुदिन ढवळीकर: वर्षभरात काम पूर्ण करण्याची ग्वाही

दैनिक गोमन्तक

हरमल: मांद्रे उपवीज केंद्रावर जवळजवळ 50 कोटी रुपये खर्च होणार आहेत. याशिवाय इतर दोन योजनेवर 30 कोटी मिळून एकूण 80 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मांद्रेतील जनतेला विनाखंडित वीजपुरवठा होईल, असे वीजमंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

भूमिगत केबल्स घालण्याच्या भूमिपूजन सोहळ्यात वीजमंत्री ढवळीकर बोलत होते. यावेळी वीज अभियंता अनिलकुमार, मांद्रे मतदारसंघातील माजी जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ढवळीकर म्हणाले, मांद्रे मतदारसंघात वीज समस्या मोठी आहे. मांद्रेतील जनतेसाठी प्रलंबित असलेले वीजपुरवठा करणारे वीजउपकेंद्र व भूमिगत केबल्स घालण्याचे काम वर्षभरात नक्की पूर्ण करू, अशी ग्वाही वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

आपण ज्या-ज्या खात्याचा मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला, त्या प्रत्येक खात्यात उल्लेखनीय कार्य करण्याची जबाबदारी पार पाडली आहे. यापुढेही ती पार पाडली जाईल. राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हे मांद्रे, पेडणे तालुक्यातील व त्यानंतर फोंडा तालुक्यातील मडकई मतदारसंघातून निवडून आले होते. या तालुक्यातील जनतेच्या विशेष मागणींची दखल व पाठपुरावा मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी केल्याने प्राधान्याने ही समस्या हाती घेण्यात आली, असेही ढवळीकर म्हणाले.

आमदार आरोलकर म्हणाले, वीजमंत्री ढवळीकर यांनी मांद्रेत उपवीजकेंद्र व भूमिगत वीजवाहिन्या घालण्याच्या कामाला प्राधान्य दिले आहे. या समस्या सोडविण्याबरोबरच धोकादायक झाडांची समस्याही त्रासदायक ठरत असल्यामुळे अनेकवेळा वीज खंडित होते. त्यामुळे धोकादायक झाडे हटविण्यासाठी मंत्री ढवळीकर यांनी संबंधित खात्याशी चर्चा करावी.

मांद्रेचे उपसरपंच महादेव हरमलकर यांनी मांद्रेवासीयांच्यावतीने मंत्री ढवळीकर यांचे अभिनंदन केले. आमदार आरोलकर यांनी पाठपुरावा केल्यामुळे उपवीजकेंद्राचे काम सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. चंद्र गावडे यांनी स्वागत केले. दयानंद मांद्रेकर यांनी सूत्रसंचालन केले. अभियंता प्रभाकर पेडणेकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT