Solar Energy प्रकल्पाचा सभापती पाटणेकर यांच्या हस्ते शुभारंभ Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत Solar Energy व्दारे वीज निर्मिती

Solar Energy प्रकल्पाचा सभापती पाटणेकर यांच्या हस्ते शुभारंभ

Dainik Gomantak

डिचोली: सौर ऊर्जेव्दारे (Solar Energy) वीज निर्मिती (Electricity) हा विकास प्रक्रियेतील महत्वाचा प्रकल्प असून, त्याचा पालिकेला निश्चितच फायदा होणार आहे. असा विश्वास डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर (Bicholim MLA & Speaker Rajesh Patnekar) यांनी व्यक्त केला आहे. गोवा एनर्जी डेव्हलोपमेंट एजन्सीच्या (GEDA) सहकार्याने डिचोली पालिकेतर्फे (Bicholim Municipality) बाजारात सोलर पीव्ही रुफ टॉप पॉवर प्लांट उभारण्यात आला आहे. टेक्सर सोल्युशन (Texar solution) कंपनीतर्फे हा प्लांट उभारण्यात आला आहे. या प्लांटचा शुभारंभ (Plant Inauguration) केल्यानंतर सभापती पाटणेकर बोलत होते.

नामफलकाचे अनावरण करून, व बटन दाबून प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, पालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, पालिका अभियंते राजेश फडते, नगरसेवक सतिश गावकर, विजयकुमार नाटेकर, रियाज बेग, सुदन गोवेकर, निलेश टोपले, अनिकेत चणेकर, ऍड. अपर्णा फोगेरी, ऍड. रंजना वायंगणकर दीपा शिरगावकर आणि दीपा पळ तसेच गेडाचे अभियंता गौरेश कवठणकर उपस्थित होते.

'एसटीपी'ची पायाभरणी

लाखेरे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळी पालिकेतर्फे शहरातील सिव्हरेजवर प्रक्रिया करणारा सिव्हरेज प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचीही वरील मान्यवरांच्या उपस्थितीत सभापती पाटणेकर यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT