Ponda City Road Patholes Dainik Gomantak
गोवा

Ponda City : फोंडा शहरात पुन्हा खड्डे !

खोदकामे सुरूच : लवकरच करणार रस्ते हॉटमिक्स

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

Ponda City : फोंडा, पावसाळा संपल्यानंतर लगेच शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खोदकामे सुरू झाल्याने रस्त्यांवरील खड्ड्यांबरोबर धूळ प्रदूषणही वाढत आहे. याचा परिणाम शहरातील वाहतुकीवरही होत आहे.

मलनिस्सारण प्रकल्प, वीज व गॅस वाहिन्यांसाठी खोदकाम हाती घेण्यात आले आहे. काही कामे गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याने रस्त्यांची स्थिती नाजूक आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांतून मुक्तता कधी मिळणार असा प्रश्न फोंड्यातील नागरिक करीत आहेत.

त्यात पाच वर्षे होऊनही अनेकांना गॅस वाहिनीच्या जोडण्या मिळाल्या नसल्यामुळे हे खड्डे नेमके कशा करता खणले जातात असाही प्रश्‍न उपस्थित केला जातो. मलनिस्सारण जोडण्याही सात वर्षे झाली तरी दिलेल्या नाहीत.

बैठक बोलवणार : रवी नाईक

वीज खाते, मल निस्सारण प्रकल्प व गॅस वहिनी अशा तीन खात्यातर्फे शहरात खड्डे खोदले जात असल्यामुळे या तीनही खात्यांची आपण लवकरच बैठक बोलवणार असून त्याना खड्डे खोदण्याची डेडलाईन देणार असल्याचे मंत्री रवी नाईक यांनी सांगितले.

एकदा रस्त्यांचे हॉट मिक्सिंग सुरू झाले की मग खड्डे काम होणे शक्य नाही असेही ते म्हणाले. त्याचबरोबर फोंडा शहरातील काही ग्राहकांना आगाऊ पैसे भरून सुद्धा गॅस कनेक्शन का मिळाले नाही याचाही पाठपुरावा करणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले.

फोंडा ‘चकाचक’ होणार

याबाबतीत फोंड्याचे आमदार तथा मंत्री रवी नाईक यांनी लवकरच शहरातील रस्त्यांचे हॉट मिक्सिंग होणार असल्याचे सांगितले. वरचा बाजार येथील संगम बेकरीपासून वारखंडे येथील हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या हॉटमिक्सिंग कामाला मंजुरी मिळाली आहे.

अवकाळी पावसामुळे अजून कामास सुरवात झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच फोंडा ''चकाचक'' होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT