Vegetables In Goa:  Dainik Gomantak
गोवा

Vegetables In Goa: राज्‍यात आणणार उत्तर प्रदेशातून बटाटा

Vegetables In Goa: प्रेमेंद्र शेट : उत्तम गुणवत्ता, वाजवी दरासाठी फलोत्पादन महामंडळाचे प्रयत्‍न

दैनिक गोमन्तक

Vegetables In Goa: राज्‍यात कांदा, बटाटा तसेच इतर भाजी शेजारच्‍या राज्‍यांतून आयात केली जाते. उतप्रदेशात बटाट्याचे उत्‍पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गोव्यातील जनतेला उत्तम दर्जाचा बटाटा आणि तोही वाजवी दरात मिळावा यासाठी गोवा फलोत्पादन महामंडळ प्रयत्नशील आहे, असे महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.

उत्तरप्रदेश फलोत्पादन महामंडळ आणि गोवा फलोत्पादन महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बटाटा व्यापारी उत्‍पादक मेळाव्यात प्रेमेंद्र शेट बोलत होते. यावेळी व्यवस्थापक चंद्रहास देसाई, कृषी संचालक नेविल आल्फोन्सो, माजी आमदार प्रकाश वेळीप, उत्तरप्रदेश फलोत्पादन महामंडळ व्यवस्थापक अंजनी कुमार श्रीवास्तव आदी मान्‍यवरांची उपस्थिती होती.

देशातील सर्वाधिक बटाट्याचे उत्पादन उत्तरप्रदेशात घेतले जाते. हा बटाटा गोव्यातही विकला जावा यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. त्‍यासाठी आम्‍ही शेतकऱ्यांसह येथे आलो आहोत.

गुणवत्ता, उत्पादन आणि वाजवी दरामुळे हा बटाटा येथील व्यापारांना आवडेल. कारण त्‍यात दलाल किंवा मध्यस्थी नसतील. याकामी आम्हाला गोवा सरकार, कृषी विभाग, फलोत्पादन महामंडळाचे उत्तम सहकार्य लाभत असल्याचे उत्तरप्रदेश फलोत्पादन महामंडळ व्यवस्थापक अंजनी कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले.

गोवा फलोत्पादन महामंडळाकडून दरदिवशी २५ हजार किलो बटाटा विकला जातो. आम्ही मोठ्या प्रमाणात तो बेळगाव येथून आणतो. परंतु उत्तरप्रदेशातून उत्तम गुणवत्ता आणि वाजवी दरात बटाटा मिळल्यास त्‍याबाबत नक्कीच विचार केला जाईल. - चंद्रहास देसाई, संचालक (गोवा फलोत्पादन महामंडळ)

राज्‍यात सध्‍या जो बटाटा विकला जातोय, तो इंदोर बटाटा आहे. उत्तरप्रदेशचा आग्रा बटाटा आहे. हा बटाटा गोमंतकीयांना कितपत आवडतो हे बघावे लागेल. तो लोकांना आवडला आणि वाजवी दरात उपलब्‍ध झाल्‍यास नक्कीच त्‍याची आयात केली जाईल.
- प्रेमेंद्र शेट, अध्‍यक्ष (गोवा फलोत्पादन महामंडळ)
गोवा फलोत्पादन महामंडळाकडून दरदिवशी २५ हजार किलो बटाटा विकला जातो. आम्ही मोठ्या प्रमाणात तो बेळगाव येथून आणतो. परंतु उत्तरप्रदेशातून उत्तम गुणवत्ता आणि वाजवी दरात बटाटा मिळल्यास त्‍याबाबत नक्कीच विचार केला जाईल.
- चंद्रहास देसाई, संचालक (गोवा फलोत्पादन महामंडळ)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT