Buffalo|Crocodile Attack  Canva
गोवा

Carambolim Lake: ‘त्या’ म्हशीचा मृत्यू बुडून, मगरीच्या चाव्याने नव्हे; स्थानिक मात्र अहवालाशी असहमत

Crocodile At Goa: अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृत म्हशीची तपासणी केल्यानंतर त्यात जखम झाल्याचे दिसत नसल्याची माहिती दिली

गोमन्तक डिजिटल टीम

Crocodile At Carambolim Lake

तिसवाडी: करमळी तळात म्हशीचा मृत्यू हा बुडून झाला आहे, मगरीच्या चाव्याने नव्हे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृत म्हशीची तपासणी केल्यानंतर अहवाल सादर केला, त्यात जखम झाल्याचे दिसत नसल्याची माहिती उपवनसंरक्षक प्रेम कुमार यांनी दिली.

पाणथळ म्हणून अधिसूचित झालेल्या करमळी तळात म्हैशीला मगरीने मारल्याचा दावा करण्यात आला होता. त्यात गणपती विसर्जनाला देखील स्थानिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. यासंदर्भात कुमार यांना प्रश्न विचारला असताना त्यांनी सांगितले की, वन खात्याचे अधिकाऱ्यांना गस्ती करून पाळत ठेवण्याची सूचना केली आहे. सध्या तळात अंदाजे ५० ते ७० मगरींची संख्या आहे.

स्थानिक दिनेश उसगावकर म्हणाले की, उपवनसंरक्षक यांनी दिलेल्या माहितीशी आम्ही सहमत नाही, कारण जनावराचा तळ्यात कधीच बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली नाही. तळ्यात मगरींची संख्या ५० – ७० असू शकत नाही. मगरींना कुंभारजुवे कालव्यात स्थलांतरित केले पाहिजे, अन्यथा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT