goa university Dainik Gomantak
गोवा

Post Graduation Result : ‘पदव्‍युत्तर’ निकालाबाबत सावळागोंधळ; काहींना अजून प्रतीक्षा

Post graduation Result : विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी विद्यापीठाचा खेळ

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालयांतून झालेल्‍या पदव्‍युत्तर अंतिम वर्षाचा निकाल वादात सापडला आहे.

राज्‍यात काही विद्यार्थ्यांना निकाल मिळाला आहे; तर बहुतांश जणांना तो मिळणे बाकी आहे, असा दावा गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाचे सचिव सुदीप नाईक यांनी केला आहे. होणारा विलंब व चाललेला सावळागोंधळ यामुळे अनेक विद्यार्थी सरकारी व खासगी नोकरभरतीला मुकले आहेत, असेही त्‍यांचे म्‍हणणे आहे.

यासंदर्भात नाईक यांनी माध्‍यमांशी संवाद साधताना आक्षेपाचे मुद्दे मांडले. ते म्‍हणाले, ज्यावेळी निकाल देण्याची वेळ येते, त्यावेळी सदोदित काही ना काही कारणे देत निकालाला विद्यापीठ प्रशासनाद्वारे विलंब केला जातो.

विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकानुसार ३ जून रोजी निकाल देणे अपेक्षित होते; परंतु पुन्हा बदल करत २५ जून रोजी निकाल दिला जाईल, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. विद्यापीठाद्वारे काही विद्यार्थ्यांचे निकाल देण्यात आले आहेत तर काहींचे निकाल दिलेले नाहीत. हा विद्यापीठाचा गैरप्रकार कसा सहन करायचा? असा सवाल उपस्‍थित करून हा विद्यार्थ्यांच्‍या भवितव्याशी खेळ सुरू असल्‍याचा आरोप नाईक यांनी केला.

विद्यापीठाचे म्हणणे काय?

१. गोवा विद्यापीठाने निकाल जाहीर करण्‍यास २५ जून ही डेडलाईन जाहीर केली होती. ४० विषयांतून पदव्‍युत्तर शिक्षण घेतले जाते. त्‍या मुदतीत ८० टक्‍के विषयांचे निकाल जाहीर करण्‍यात आले. उर्वरित विषयांचे निकाल ३ जुलैपूर्वी देण्‍यात येतील.

२. पदव्‍युत्तर शिक्षणासाठी नवे शैक्षणिक धोरण स्‍वीकारण्‍यात आले, त्‍यास आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍याद्वारे पहिली बॅच आता ‘पासआऊट’ होईल. नव्‍या धोरणानुसार निकालासाठी वापरण्‍यात येणाऱ्या सॉफ्‍टवेअरने दाखवलेल्‍या त्रुटी दूर करण्‍यासाठी काहीसा अवधी लागल्‍याने दिलेली डेललाईन हुकली.

३. लवकरात लवकर पूर्ण निकाल दिले जावेत, यासाठी आमचे प्रयत्‍न सुरू आहेत.

मुलाखत नाहीच

गोवा तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे काही नोकऱ्यांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. आज मुलाखत होती. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. परंतु विद्यार्थ्यांकडे परीक्षेचा निकालच नसल्याने त्यांची मुलाखत घेतली गेली नाही. त्‍यामुळे त्यांची नोकरीची संधी हुकली आहे, असा आरोप नाईक यांनी केला.

काही वर्षांपूर्वी गोवा युनिव्‍हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टम सॉफ्टवेअरद्वारे निकाल जलदगतीने व्हावा यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्‍यात आले होते. परंतु तो प्रयत्‍न फसला. त्यामुळे गेल्या वर्षी नवी प्रणाली आणली. तरीसुद्धा निकालाला विलंब होत आहे. गोवा विद्यापीठाद्वारे दरवर्षी निकालाला विलंब होतो. विद्यार्थ्यांना त्रास देणे आता नित्याचेच झाले आहे. पीडित विद्यार्थ्यांना न्याय दिला नाही तर आम्ही रस्त्यावर उतारल्याशिवाय राहणार नाही.

- नौशाद चौधरी, एनएसयूआय संघटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT