Coronavirus Increase Brain Stroke Dainik Gomantak
गोवा

Covid-19 and Brain Stroke : ‘पोस्‍ट कोविड’चे घातक परिणाम; हृदयविकार, ब्रेनस्‍ट्रोकमध्‍ये वाढ

Goa: रोगप्रतिकारक शक्‍तीच्‍या जोरावर कोविडवर मात केलेल्‍या लहान मुलांना कालांतराने नवनवीन शारीरिक समस्‍यांना सामोरे जावे लागत आहे.

दैनिक गोमन्तक

Post Covid Increase In Heart Disease : कोरोना महामारीचे मानवी शरीरावर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. 20 ते 35 वयोगटातील तरुणांचे हृदयविकार, मेंदूत रक्‍तस्राव होऊन अचानक मृत्‍यू होण्‍याचे प्रमाण लक्षणीयरीत्‍या वाढले आहे. रोगप्रतिकारक शक्‍तीच्‍या जोरावर कोविडवर मात केलेल्‍या लहान मुलांना कालांतराने नवनवीन शारीरिक समस्‍यांना सामोरे जावे लागत आहे.

कोरोनामुक्‍त झालेल्‍या व्‍यक्‍तींची फुप्फुसे कमकुवत झाल्‍याचे चाचण्‍यांच्‍या अंती स्‍पष्‍ट झाले आहे; तर बाळंतपणात अधिक रक्‍तस्राव होऊन महिलांचे मृत्‍यू होण्‍याचे देशभर प्रकार वाढले आहेत. गोव्‍यातही अशा घटना घडत आहेत, अशी धक्‍कादायक माहिती शुक्रवारी ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात वैद्यक क्षेत्रातील तज्‍ज्ञांनी दिली.

डॉ. मधू घोडकिरेकर (फॉरेन्‍सिक सायन्‍स विभाग प्रमुख) व डॉ. धनेश वळवईकर (इम्‍युनोलॉजिस्‍ट, गोवा सरकारच्‍या तज्‍ज्ञ समितीचे सदस्‍य) यांच्‍याशी ‘गोमन्‍तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी संवाद साधला. यावेळी डॉ. घोडकिरेकर म्‍हणाले, दक्षिण गोव्‍यात करण्‍यात आलेल्‍या 559 शवचिकित्‍सा प्रकरणांचा अभ्‍यास केला असता काही धक्‍कादायक बाबी आढळल्‍या.

त्‍यापैकी 73 जणांचा अचानक मृत्‍यू झाल्‍याचे समोर आले आणि त्‍यातील 47 जण हे 50 वर्षांखालील होते. सामान्‍य मृत्‍यू होणे नवीन नाही; पण त्‍यात एकाएकी दिसणारी वाढ चिंताजनक आहे. अमेरिकेतील फ्‍लोरिडा विद्यापीठाने केलेल्‍या संशोधनातून ‘पोस्‍ट कोविड’ परिणाम समोर आले आहेत.

दक्षिण गोव्‍यात एकाएकी मृत्‍यू झाल्‍याची जी प्रकरणे समोर आली आहेत, त्‍याचा कोरोनाशी संबंध नक्‍कीच जोडता येतो.‘पोस्‍ट कोविड’वर अद्याप अभ्‍यास नाही

डॉ. धनेश वळवईकर म्‍हणाले, कोरोना लसीचे साईड इफेक्‍ट आहेत का, याबाबत अद्याप चर्चा वा अभ्‍यास झालेला नाही. तथापि, प्रतिबंधक लस घेणे कधीही योग्‍यच. कोरोना नियंत्रणात कसा आणावा, यावर महामारी काळात लक्ष देण्‍यात आले. मात्र, ‘पोस्‍ट कोविड’ काय स्‍थिती आहे, याचा अद्याप आढावा घेण्‍यात आलेला नाही.

रक्‍त तपासणीतून बदल

डॉ. घोडकिरेकर म्‍हणाले, अति रक्‍तस्राव होऊन महिलांचे मृत्‍यू झाल्‍याचे हल्‍लीच चार प्रकार घडले. संबंधित कुटुंबीयांच्‍या समंजसपणामुळे ते विषय पोलिसांत पोहोचले नाहीत. आपली बदललेली जीवनशैली पुन्‍हा योग्‍य करण्‍याची गरज आहे.

कोरोनानंतर अनेकांच्‍या रक्‍त तपासणीतून धक्‍कादायक बदल दिसून येत आहेत. करोना प्रतिबंधक लशीच्‍या उपयुक्‍तता मान्‍य करायला हवी. त्‍याचे साईड इफेक्‍ट होतात, असे सध्‍या तरी स्‍पष्‍ट झालेले नाही.

डॉ. घोडकिरेकर म्‍हणतात...

कोरोना महामारीनंतर आपल्‍यात शारीरिक पातळीवर बदल झाले आहेत. ते अनेकांना कळलेले नाहीत. उदाहरण घ्‍यायचे झाल्‍यास, ढोबळमानाने दुपारी 12.30 या वेळेत जी विश्रांतीची गरज वाटायची, त्‍याची जाणीव आता एक तास आधीच होते.

बाळंतपणात अधिकचा रक्‍तस्राव होऊन मृत्‍यू होण्‍याचे प्रमाण वाढले आहे. रक्‍त गोठण्‍याची प्रक्रिया मंदावल्‍याने असे प्रकार घडत आहेत. हा ‘पोस्‍ट कोविड’चा प्रकार आहे, असे सिद्ध झाले नसले तरी तशी दाट शक्‍यता आहे.

स्‍त्रीरोग तज्‍ज्ञांच्‍या इस्‍पितळांनजीक रक्‍तपेढ्या हव्‍यात, अशी मागणी वाढत आहे. अत्‍यवस्‍थ रुग्‍णांना अन्‍यत्र हलवणे धोक्‍याचे ठरते.

डॉ. वळवईकर म्‍हणतात...

चाचण्‍यांतून असे आढळून आले आहे की, कोरोनातून बऱ्या झालेल्‍या बहुतांश व्‍यक्‍तींच्‍या फुप्फुसांची क्षमता कमी झाली. अशा व्‍यक्‍तींच्‍या पुन्‍हा तपासण्‍या करण्‍यात येत आहेत.

रोगप्रतिकार शक्‍तीच्‍या जोरावर लहान मुलांनी कोरोनावर मात केली; पण त्‍यानंतर एकाएकी शरीराच्‍या कोणत्‍याही भागाला सूज येणे, हृदयाला हानी पोहोचल्‍याचे समोर येत आहे. ज्‍यांना कोरोना झाला होता, त्‍यांनी स्‍वत:च्‍या सुरक्षेसाठी जरूर हृदय तपासणी करून घ्‍यावी.

जेष्‍ठांनी बूस्‍टर डोस घ्‍यावा. त्‍यामुळे रोगप्रतिकारक शक्‍ती वाढते. मंकीपॉक्‍सची लस घेतलेल्यांना स्‍मॉलपॉक्‍सचा त्रास झाला नाही, असा अनुभव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT