Rain Update | Goa Weather Updates Dainik Gomantak
गोवा

Weather Updates : गोव्यात काही ठिकाणी आज पावसाची शक्यता

गोव्यात अनेक भागात ढगाळ वातावरण, उकाडाही कायम

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात आज काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. अनेक भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून काल गुरुवारी संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून गोव्यात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. (Goa Weather Updates)

गोव्यात नेहमीच पावसाची दमदार हजेरी असणाऱ्या सत्तरी आणि धारबांदोडा तालुक्यांवर ढग जमा झाले असून गोव्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आज गोव्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही तासांत उत्तर गोव्यात काही ठिकाणी पाऊस असेल. त्यामुळे गोवेकरांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.

दरम्यान गोव्यात उकाडाची कायम आहे. सततच्या उकाड्यामुळे गोवेकर त्रस्त झाले असून वीजेच्या टंचाईमुळे गोव्यात अनेकदा लोड शेडिंगही केलं जात आहे. यातच अनेकदा पाऊस पडत असल्याने वादळी वाऱ्यामुळे वीजप्रवाह खंडित होतो. त्यामुळे गेल्या काही दिवसात सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT