Crime Dainik Gomantak
गोवा

Crime News: घरफोडी प्रकरणी कर्नाटकातील तिघा संशयितांना अटक; पर्वरी पोलिसांची कारवाई

संशयितांनी शुक्रवारी बेती येथे घरफोडी केली होती

Rajat Sawant

House Breaking Theft At Betim: बेती येथील घरफोडी प्रकरणी पर्वरी पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली आहे. संशयित कर्नाटक येथील असून त्यांना न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणिता मांद्रेकर अधिक तपास करीत आहेत.

पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 सप्टेंबरला बेती येथे एका महिलेच्या घरी घरफोडीत 50 हजार रुपयांच्या ऐवाजाची चोरी झाल्याची तक्रार नोंद झाली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला.

बेती येथे एक व्यक्ती संशयास्पद रित्या फिरत असल्याचे आढळून आल्यावर पोलिसांनी सापळा रचत संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. संशयिताची चौकशी केली असता त्याच्याकडे चोरीचा मुद्देमाल आढळून आला.

अधिक चौकशी केली असता या चोरीच्या गुन्ह्यात अन्य दोघांचा समावेश असल्याची माहिती संशयिताकडून मिळाली. माहितीच्या आधारे दोघा संशयितांना अटक करण्यात आली.

मोहम्मद सादिक (26), मोहम्मद कासिम (26), इस्माईल कोच्वी (39) रा. कर्नाटक अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत अशी माहिती पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनंत गावकर यांनी दिली.

संशयितांंना न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक प्रणिता मांद्रेकर अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs Sterilization: नसबंदीसाठी खर्च 3,500, सरकारी मदत फक्त 1,800! निधीच्या नियमांवर कोर्टाचे ताशेरे; अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा

Aggressive Dog Breeds Ban: 'आक्रमक' कुत्र्यांच्या बंदीचा निर्णय सरकारने तूर्त गुंडाळला, केंद्राच्या निर्णयाविरोधात याचिका; न्यायालयीन निकालाची गोवा सरकारला प्रतीक्षा

RBI Repo Rate Hike: होम लोन, कार लोन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! आरबीआयने रेपो रेटमध्ये केली 'इतक्या' टक्क्यांची वाढ; 4 वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय

Teacher Regularization: तासिका शिक्षकांना मोठा दिलासा! 10 वर्षांहून अधिक सेवा केलेल्यांना नियमित करण्याची प्रक्रिया 15 दिवसांत सुरू; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Car Accident: टेनिस सामना खेळून परतताना काळाचा घाला! कारच्या भीषण अपघातात तीन खेळाडूंचा मृत्यू; 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT