arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 'दरमहा 1लाख खंडणी द्या'! बांधकाम व्यावसायिकाला धमकी; फरार सराईत गुन्हेगार 'टारझन'सह तिघांना अटक

Goa Extortion Case: या प्रकरणात त्या दोघांना उच्च न्यायालयाने सशर्त जामीन दिला होता. त्यांना उत्तर गोव्यात प्रवेश न करण्याची अट घातली होती. त्यांच्याविरुद्ध उत्तर गोव्यात आणखी गुन्हे नोंद झाले होते.

Sameer Panditrao

पणजी: बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी फरार सराईत गुन्हेगार टारझन पार्सेकर, सागर पाटील आणि सनिश घाटवळ या तिघांना अटक केली. ही कारवाई पेडणे पोलिसांच्या मदतीने करण्यात आली.

गुन्हेगार टारझन पार्सेकर आणि सागर पाटील या दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्या, खंडणी वसुली असे अनेक गुन्हे नोंद आहेत. टारझनच्या टोळीने २०२२ साली रवी शिरोडकर याच्यावरील हल्लाप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला होता.

या प्रकरणात त्या दोघांना उच्च न्यायालयाने सशर्त जामीन दिला होता. त्यांना उत्तर गोव्यात प्रवेश न करण्याची अट घातली होती. मात्र, जामीन मिळाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध उत्तर गोव्यात आणखी गुन्हे नोंद झाले होते. त्यांनी एका अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांना मारहाण करून

जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी हणजूण पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. उच्च न्यायालयाने घातलेल्या शर्थींचे उल्लंघन केल्याने त्यांना दिलेला जामीन गेल्या वर्षी रद्दबातल ठरविला होता. त्यामुळे गेल्या वर्षीपासून ते फरार होते आणि पोलिस त्यांचा शोध घेत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टारझनने बांधकाम व्यावसायिकाला एक लाख रुपये दरमहा खंडणी देण्यासाठी धमकावले होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्याने पुन्हा ५ लाख रुपये प्रतिमहा देण्याची मागणी केली. त्याच्या या धमकीला न जुमानता या व्यावसायिकाने पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरू केला असता तो पेडण्यात असल्याची माहिती मिळाली. पेडणे पोलिसांना माहिती दिल्यावर सूत्रे वेगाने हलली. पोलिस मागावर असल्याची चाहूल लागताच त्या दोघांनी गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच त्यांना गजाआड करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT