porvorim Police Arrested Accused Dainik Gomantak
गोवा

Crime News: दोडामार्ग येथील युवकावर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक, पर्वरी पोलिसांची कारवाई

हल्ला पैशांच्या देवाणघेवाणीवरून झाल्याची माहिती समोर येत आहे

Rajat Sawant

Porvorim Police Arrest Accused In Allegedly Attempting Murder Case: नेरुल येथे एका युवकावर प्राणघातक हल्ल्या प्रकरणी पश्चिम बंगाल येथील एका संशयिताला पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे. हा हल्ला पैशांच्या देवाणघेवाणीवरून झाल्याची माहिती समोर येत आहे.

जखमी युवकाला गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक सर्वेश भंडारी अधिक चौकशी करीत आहेत.

पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिटवाळा नेरूल येथील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 1 ऑक्टोंबरला सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास नेरुल चर्च जवळ, पश्चिम बंगाल येथील दीपक कुमार पाधी या युवकाने उसप, दोडामार्ग येथील अनिल महादेव गावस या 33 वर्षीय युवकाच्या छातीवर व शरीराच्या इतर भागावर चाकूने वार केले असे तक्रारीत नमुद करण्यात आले.

तक्रारीच्या आधारे पर्वरी पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला असता दीपक कुमार पाधी रा. नेरुळ बार्देश याला अटक करण्यात आले. संशयिताला म्हापसा न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जखमी युवक हा नेरूलमध्ये भाड्याने राहत होता.

तर संशयित कांदोळी येथील एका कॅसिनोमध्ये काम करत होता तर तो नेरुल येथे राहत होता. दोघांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाल्याने ही घटना घडली असे तपासात समोर आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT