Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पोलीस असल्याचे भासवून पर्वरी महामार्गावर अडवली गाडी, 8 लाख लुटले; इराणी गँगमधील संशयिताला पुण्यातून अटक

Porvorim Crime: पर्वरी येथील महामार्गावर पोलिस असल्याचे भासवून एका टोळीने मटण-चिकन विक्रेत्याची गाडी अडवून ८ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळविली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: पर्वरी येथील महामार्गावर पोलिस असल्याचे भासवून एका टोळीने मटण-चिकन विक्रेत्याची गाडी अडवून ८ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळविली होती. याप्रकरणी इराणी टोळीतील एकाला अटक करण्यात पर्वरी पोलिसांना यश आले.

पोलिसांनी लोणी, काळभोर-पुणे येथून मुख्तार सय्यद इराणी (वय ३४ वर्षे, रा. पुणे) याला अटक केली. या कुविख्यात संशयिताचा महाराष्ट्र व कर्नाटक येथील १८ गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभाग आहे. पर्वरी पोलिसांनी अटक केलेल्या मुख्तार ठडी सुनावली आहे. पोलिस चोरीचा मुद्देमाल आणि इतर संशयितांचा शोध घेत आहेत. ही चोरीची घटना १२ ऑक्टोबर रोजी घडली होती.

संशयितांनी पोलिस अधिकाऱ्यांचा वेश धारण केला होता. त्यांनी गाडीची तपासणी करण्याच्या बहाण्याने चालक आणि मालकाला गाडीच्या मागे नेले. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला असलेल्या साथीदाराने गाडीच्या केबिनमधून ८ लाखांची रोकड असलेली बॅग चोरून पळ काढला होता. गोव्यातील दुकानदारांना चिकन-मटण पुरवठा करून मिळविलेली रक्कम घेऊन पीडित सोलापूरकडे परतत होते.

या तपासाच्या अनुषंगाने पुणे क्राईम ब्रँचच्या मदतीने पर्वरी पोलिसांनी अखेर टोळीतील एका संशयिताला ३१ ऑक्टोबर रोजी पुणे येथे अटक करून त्याला गोव्यात आणले. पोलिसांनी एक दुचाकीही हस्तगत केली आहे. पोलिसांनी पुणे, कल्याण, मुंबई तसेच इतर काही ठिकाणी छापे टाकून संशयितांचा शोध घेतला.

पुण्यात पोलिसांच्या हातावर दिली तुरी

याप्रकरणी पर्वरी पोलिसांची पथके पुणे व अंबिवली येथील इराणी वस्तीत वास्तव्यास होती. तिथे या पथकांनी तळ ठोकून संशयितांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयित तेथूनही पळून गेले. कालांतराने ही पोलिस पथके माघारी परतली; परंतु पर्वरी पोलिसांकडून या टोळीचा शोध सुरूच होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT