Arjun Parab Passed Away Dainik Gomantak
गोवा

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

गोमन्तक डिजिटल टीम

Arjun Parab Passed Away

ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन जयराम परब यांचे आज सकाळी ८.३० वा. 'गोमेकॉ' इस्पितळात निधन झाले. मृत्यूसमयी त्याचे वय ८८ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते. आज (शुक्रवारी) दुपारी त्यांचे पार्थिव त्यांच्या विर्नोडा येथील निवासस्थानी आणल्यावर मान्यवरांसह परिसरातील चाहत्यांनी अंत्यदर्शन घेतले.

संदीप या पुत्राने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. संदीप, दीपू हे त्यांचे दोन पुत्र, नारायण उर्फ दादी परब यांचे ते चुलते होत.

लोक भूमीचे संपादक रमेश कोलवाळकर, माजी उपसभापती तथा साहित्यिक शंभू भाऊ बांदेकर, समाज कार्यकर्ते देवेंद्र कांदोळकर, विर्नोडाचे माजी सरपंच सहदेव परब, देवेंद्र परब, विद्यमान पंच व माजी सरपंच प्रदीप परब आदी मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

अर्जुन जयराम परब यांचा जन्म विर्कोडा गावात १९२६ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठात बीए. अर्थशास्त्र, एमए. ते शिवाजी विद्यापीठात मराठीत दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण झाले.

परब यांचे प्रकाशित साहित्य

आशेचा अंकुर (नाटक), क्रांतीवीर भगतसिंग (वैचारिक); डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक चिंतन प्रकटन (वैचारिक); लोककला दशावतार (संशोधनात्मक); श्रींची इच्छा (शिवाजी महाराजांवरील लेख); ज्ञानयोगी ज्ञानेश्वर (प्रबोधनात्मक); विचारवेध (संकीर्ण लेखसंग्रह); संत गाडगेबाबांची कीर्तने; शिवाजी त्यांचा, शिवाजी आमचा (वैचारिक); ज्ञानदीप लावू जगी (वैचारिक); सनातन संस्कृतीचा पंचनामा; गरीब देशातील श्रीमंत देव. राजकारण, समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन आदी विविध विषयांवर लोकप्रिय दैनिकांतून सतत लेखन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT