Pooja Naik job scam Dainik Gomantak
गोवा

Pooja Naik Case: ‘देवच काय ते बघून घेईल’! ढवळीकर समर्थक आक्रमक; मंदिरात घातले गाऱ्हाणे, पूजा नाईकच्या वक्तव्याचा जोरदार निषेध

Sudin Dhavalikar Supporters: पूजा नाईक हिने वीजमंत्री ढवळीकर यांच्यावर सरकारी नोकऱ्या विकल्याचा आरोप केल्यामुळे तिच्या वक्तव्याचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: जॉब स्कॅमप्रकरणी पूजा नाईक हिने मगोपचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर केलेल्या आरोपांचा निषेध करून मगोपप्रेमी कार्यकर्ते तसेच हितचिंतक यांनी फर्मागुढी येथील कटमगाळ दादा महाराजांना गाऱ्हाणे घातले. त्यानंतर मडकईतील देवी नवदुर्गा मंदिरातही गाऱ्हाणे घालून या खोट्या प्रकरणात जे कुणी गुंतले आहेत त्यांना योग्य शिक्षा मिळावी, अशी मागणी केली.

यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. ‘ज्यांनी समाजातील कमकुवत घटकांना मदतीचा हात देऊन त्यांचा उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न केला, ते मगोपचे नेते, मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर जॉब स्कॅमप्रकरणी खोटे आरोप करणाऱ्यांना तूच कडक शिक्षा कर’ असे गाऱ्हाणे मगोपचे कार्यकर्ते तसेच मगोपप्रेमी नागरिकांनी रविवारी कटमगाळ दादा आणि मडकई येथील देवी नवदुर्गेला घातले.

पूजा नाईक हिने वीजमंत्री ढवळीकर यांच्यावर सरकारी नोकऱ्या विकल्याचा आरोप केल्यामुळे तिच्या वक्तव्याचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला. हे गाऱ्हाणे घालतेवेळी प्रचंड संख्येने लोक उपस्थित होते. त्यात मगोप कार्यकारिणी सदस्य तसेच जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य आणि मगोपप्रेमी नागरिकांचा समावेश होता.

‘देवच काय ते बघून घेईल’

यावेळी मगोप कार्यकारिणी सदस्य अनंत नाईक, जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी, सरपंच रामचंद्र नाईक, मनुजा नाईक, माजी सरपंच राजेश कवळेकर यांनी पूजा नाईकचा निषेध करताना ‘देवच काय ते बघून घेईल’ असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT