Pooja Naik Dainik Gomantak
गोवा

Pooja Naik Case: पूजा नाईकला थोडी खुशी थोडा गम; सशर्त जामीन मंजूर पण न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa Crime News: पूजा नाईक राहत असलेल्या ओल्ड गोव्यातील पॉश कॉलनीमध्ये जाऊन चौकशी सुरू केली आहे.

Pramod Yadav

फोंडा: सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणारी पूजा नाईक हिला फोंडा प्रथमवर्ग न्यायालयाने २० हजार रुपयांची हमी आणि अन्य अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र या अटींची पूर्तता करेपर्यंत तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने प्रियोळ येथील गुरुदास गावडे यांना गंडा घातल्याच्या प्रकरणात म्हार्दोळ पोलिसांनी अटक केलेल्या श्रावणी ऊर्फ पूजा नाईक हिच्या ताब्यातील चार महागड्या कारगाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

तसेच ती राहत असलेल्या ओल्ड गोव्यातील पॉश कॉलनीमध्ये जाऊन चौकशी सुरू केली आहे. एकदम साधी राहणीमान आणि पतीचा मासळी विक्रीचा व्यवसाय असूनसुद्धा तिच्याकडे चार प्लॅट असल्याची बाब समोर आली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील या प्रकरणाची दखल घेत यात दोन सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती दिली. पूजा नाईकने सरकारी विभागातील अधिकऱ्यांना हाताशी धरुन अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या बाबीं देखील विचारात घेऊन पोलिस तपास करत आहेत.

पूजा नाईक प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. यासंबधित अनेकांची नावे समोर येत आहेत. पोलिसांनी आत्तापर्यंत नऊ जणांना ताब्यात घेतले असून, अजून काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश देखील या प्रकरणात समावेश उघड झाल्याने काही मंत्र्यांची देखील नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून, काही मंत्र्यांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT