Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Pooja Naik: सरकारी नोकऱ्या गुणवत्तेनुसारच दिल्‍या गेल्या! 'कॅश फॉर जॉब' आरोपांना चौकशी अहवालानंतर उत्तर, ढवळीकरांचं स्‍पष्‍टीकरण

Goa Job Scam: गेल्‍या २६ वर्षांच्‍या राजकीय कारकिर्दीत मंत्री म्‍हणून आपण ज्‍या खात्‍यांचा कारभार हाताळला, त्‍या प्रत्‍येक खात्‍यातील नोकऱ्या या उमेदवारांच्‍या गुणवत्तेवरच देण्‍यात आल्‍या.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गेल्‍या २६ वर्षांच्‍या राजकीय कारकिर्दीत मंत्री म्‍हणून आपण ज्‍या खात्‍यांचा कारभार हाताळला, त्‍या प्रत्‍येक खात्‍यातील नोकऱ्या या उमेदवारांच्‍या गुणवत्तेवरच देण्‍यात आल्‍या. त्‍या देताना कधीही पैशांची देवाण–घेवाण झालेली नाही. ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात आपल्‍यावर झालेल्‍या आरोपांचे उत्तर या प्रकरणाचा चौकशी अहवाल हाती आल्‍यानंतरच देईन, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

सरकारी नोकऱ्या मिळवून देण्‍यासाठी लोकांकडून पैसे घेतल्‍याचे पूजा नाईक हिचे प्रकरण गतवर्षी राज्‍यभर गाजले होते. या प्रकरणात पूजा नाईकसह नऊ जणांना अटकही झालेली होती.

हे प्रकरण शमलेले असतानाच काहीच दिवसांपूर्वी पूजा नाईक हिने ‘कॅश फॉर जॉब’मध्‍ये लोकांकडून घेतलेले १७.६८ कोटी रुपये आपण आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे (पीडब्‍ल्‍यूडी) प्रधान मुख्‍य अभियंता उत्तम पार्सेकर यांना दिल्‍याचा आणि या दोघांची ओळख आपल्‍याला मंत्री सुदिन ढवळीकर यांनी करून दिल्‍याचा गौप्‍यस्‍फोट केला.

त्‍यामुळे राज्‍यात पुन्‍हा खळबळ माजली. परंतु, या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्‍याचे मंत्री ढवळीकर यांनी स्‍पष्‍ट केले होते. आयएएस अधिकारी देसाई यांनी पूजाला कायदेशीर नोटीस बजावली, तर पार्सेकर यांनी मात्र या विषयावर आतापर्यंत मौन बाळगले आहे. मुलाखती अशा प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतरच नोकऱ्या मिळतात, असेही ते म्हणाले.

केबल्‍स कापण्‍याचा निर्णय योग्‍यच

वीज खांबांवरील केबल्‍स कापण्‍याचा निर्णय चांगलाच आहे. खात्‍याच्‍या अभियंत्‍यांना जे अधिकार दिलेले आहेत, त्‍यानुसारच ते काम करीत आहेत. पण, अशा केबल्‍समुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी केबल्‍स ऑपरेटर्सनी घेणे गरजेचे आहे, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT