A team of students who have achieved success in the Polytoria intercollegiate competition. Dainik Gomantak
गोवा

‘पॉलिटोरिया’त फोंड्याचे पीईएस् कॉलेज अव्वल

आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा: दोन वर्षांच्या खंडानंतर सीईएस् महाविद्यालयातर्फे आयोजन

दैनिक गोमन्तक

कुंकळ्ळी: सीईएस् महाविद्यालय, कुंकळ्ळी येथील राजशास्त्र आणि इतिहास विभागाने ‘पॉलिटोरिया’ हा आंतरमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 31 मार्च रोजी कार्यक्रम आयोजित केलेला होता. यात आयोजित 7 पैकी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून फोंड्याचे पीईएस् महाविद्यालय अव्वल ठरले. दुसरे केपे शासकीय महाविद्यालय तर नुवेंच्या कार्मेल महिला महाविद्यालयाने तिसरे स्थान पटकावले. 2 वर्षे ठप्प झालेले कार्यक्रम पुन्हा सुरू करून युवकांमध्ये नवचेतना रुजविण्याचे कार्य सीईएस महाविद्यालयाने केले.

कोविड काळात आलेली मरगळ दूर करून राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला. यात वक्तृत्व स्पर्धा, सूक्ष्म वस्तू (मिनिएचर) बनवण्याची स्पर्धा, राजकारणातील प्रसिद्ध व्यक्तींची नक्कल करण्याची स्पर्धा (पर्सनॅलिटी ईनॅक्शन), कांतार गायन स्पर्धा, ध्वनीचित्रफीत बनवण्याची स्पर्धा, पथनाट्य, लोकनृत्य अशा नानाविध स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या.

पर्सनॅलिटी ईनॅक्शन या स्पर्धेत प्रथम – श्री मल्लिकार्जुन महाविद्यालय, काणकोण, द्वितीय- पी. ई. एस्. महाविद्यालय, फोंडा व तृतीय- कारमेल महाविद्यालय, नुवें ह्यांना मिळाले. ध्वनीचित्रफीत बनवण्याची स्पर्धेत प्रथम बक्षीस गोवा वैदकीय महाविद्यालयाला, द्वितीय बक्षीस शासकीय महाविद्यालय, सांखळी तर, तृतीय बक्षीस स्वामी ब्रह्मानंद महाविद्यालय, कुंडई यांना प्राप्त झाले.

पथनाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक पी. ई. एस्. महाविद्यालय, फोंडा यांनी पटकवले तर दुसरे शासकीय महाविद्यालय केपे व तिसरे पारितोषिक दामोदर महाविद्यालय, मडगावला प्राप्त झाले.

वक्तृत्व स्पर्धेत शासकीय महाविद्यालय,केपे प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत केपे शासकीय महाविद्यालयाने प्रथम पारितोषिक पटकविले तर नुवेंच्या कार्मेल महिला महाविद्यालयला पारितोषिक प्राप्त झाले. तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला तिसरे पारितोषिक प्राप्त झाले. सूक्ष्म वस्तू (मिनिएचर) बनवण्याच्या स्पर्धेत शासकीय महाविद्यालय केपेला प्रथम तर दामोदर महाविद्यालय, मडगावला दुसरे व पीईएस् महाविद्यालय, फोंडा यांना तिसरे पारितोषिक प्राप्त झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT