Ponda Police Arrested Three Accused Dainik Gomantak
गोवा

सकाळी केली रेकी, रात्री मारला डल्ला; पाजीमळ शिरोडा येथे 9 लाखाच्या घर फोडीप्रकरणी युवतीसह दोघांना अटक

घरात चोरट्यांनी 9 लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता

Rajat Sawant

Ponda Police : पाजीमळ शिरोडा येथील घर फोडीप्रकरणी 3 चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. संशयितांमध्ये यात दोघा युवकांचा तर एका युवतीचा समावेश आहे. 9 जून रोजी चोरट्यांनी पाजीमळ शिरोडा येथील एका घरात चोरट्यांनी 9 लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पाजीमळ शिरोडा येथील एका घरात 9 जून रोजी रात्री 10.30 च्या दरम्यान चोरट्यांनी दरवाजा फोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील 9 लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. तसेच वीस हजाराची रोख घेऊन त्यांनी पोबारा केला होता.

चोरीची तक्रार घरमालकाने फोंडा पोलिसात दिली. तक्रारीच्या आधारे फोंडा पोलिसांनी तपसाला सुरुवात केली. चोरीच्या दिवशी त्या भागात एक अज्ञात जोडपे पांढऱ्या दुचाकी वरून परिसरात फिरत असल्याची माहिती काही लोकांनी दिली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनाचा शोध घेत वाहनाच्या आधारे चोरट्यापर्यंत पोहोचले.पोलीसांनी हिसका दाखवताच दोन्ही चोरट्यानी आपला गुन्हा लगेचच कबूल केला. गॅबी फर्नांडिस (25, रा. आंबेउदक, सावर्डे) शबनम चलवादी (24, नावेली) व महमद कासिम शेख (22, चांदर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलीस उपनिरीक्षक रश्मी भाईडकर, आदित्य नाईक गावकर, यांच्याबरोबर पोलीस केदार जल्मी, अमेय गोसावी, आदित्य नाईक यांनी या संदर्भात चांगली कामगिरी बजावली. फोंडा स्थानकाचे उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी सदर सदरच्या चोरीप्रकरणी तपास यंत्रणेला योग्य ते मार्गदर्शन केल्याने सदर गुन्ह्याचा छडा लागू शकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT