Arrested Dainik Gomantak
गोवा

Ponda Crime News : महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एकाला अटक; फोंडा पोलिसांची कारवाई

संशयित पोलिस कोठडीत असून फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda police : एका महिलेचा पाठलाग करुन विचित्र हातवारे करीत त्रास दिल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दिली होती. संशयित पोलिस कोठडीत असून फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने 12 ऑगस्टला फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीत असे नमुद करण्यात आले की, संशयित आरोपीने शुक्रवारी शिरोडा येथे तक्रारदार महिलेचा पाठलाग करीत लैंगिक छळ केला. तसेच फिर्यादीला हातवारे केले.

त्यानंतर फिर्यादी व तिचा पती संशयित आरोपीला भेटायला गेले असता आरोपीने फिर्यादी व तिच्या पतीला पोलिसांना माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेत अटक केली. पांडुरंग गावकर (42) रा. शिरोडा या संशयिताला अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. दक्षिण गोव्याचे एसपी अभिषेक धानिया, फोंडा पीआय तुषार लोटलीकर, एसडीपीओ फोंडा आशिष शिरोडकर यांच्या देखरेखीखाली एलपीएसआय रश्मी बैडकर पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT