Goa Pay Parking Dainik Gomantak
गोवा

Ponda Pay Parking: फोंडा शहरातील पार्किंग समस्या संपणार? 2 ठिकाणी होणार पे प्रोजेक्ट; पालिकेकडून जागा निश्‍चित

Pay Parking Project Ponda: फोंडा पालिकेच्या बैठकीत यापूर्वीच ‘पे पार्किंग’संबंधी चर्चा करण्यात येऊन आवश्‍यक ठराव घेण्यात आला आहे.

Sameer Panditrao

फोंडा: वाढती वाहने, पण रस्ते मात्र तेच अशी स्थिती झालेल्या फोंड्यातील पार्किंगची समस्या जटिल बनत चालली असून जागा मिळेल, तेथे पार्किंग करून इतरांना त्रासदायक ठरणाऱ्या कृतीविरुद्ध आता फोंडा पालिकेने बडगा उगारला असून लवकरच फोंडा जुने बसस्थानक तसेच पाडलेल्या शास्त्री सभागृह इमारतीच्या जागी अशा दोन ठिकाणी सुरवातीला ‘पे पार्किंग’ करण्यात येणार आहे.

फोंडा पालिकेच्या बैठकीत यापूर्वीच ‘पे पार्किंग’संबंधी चर्चा करण्यात येऊन आवश्‍यक ठराव घेण्यात आला आहे. दर माणशीमागे दोन वाहने असे समीकरण सध्या फोंड्यात होत असून वाढत्या वाहनांना आपल्या पोटात घ्यायला फोंडा शहर असमर्थ ठरत आहे, त्यामुळे केवळ शिस्त हाच त्यावर उपाय असल्याच्या निष्कर्षाप्रत फोंडा पालिका आली असून त्यामुळेच ‘पे पार्किंग’ची योजना आता सुरू करण्यात येणार आहे.

शास्त्री इमारतीच्या जागी रस्ता समपातळीवर आणून हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार आहे, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने दगड आणून टाकले आहेत, त्यामुळे येत्या आठ दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.शहरात ‘पे पार्किंग’ची योजना सुरुवातीला दोन ठिकाणी कार्यान्वित होणार आहे. फोंड्यातील जुने बसस्थानक परिसर तसेच पाडलेल्या शास्त्री इमारतीच्या जागी अशा दोन ठिकाणी ‘पे पार्किंग’ सुरू करण्यात येणार असून त्यानंतर वरचा बाजार तसेच तिस्क - फोंडा भागात हळूहळू पे पार्किंगची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.नाही, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

शिस्त आणि निधी!

फोंड्यात पे पार्किंगमुळे वाहतुकीत शिस्त येणार आहे, शिवाय पालिकेच्या निधीतही वाढ होणार असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. वाहतूक पोलिस आपल्यापरीने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करीत आहेत, मात्र बेजबाबदार आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे वाहतूक पोलिसांचे काम वाढले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT