Tax Dainik Gomantak
गोवा

Ponda: फोंडा पालिकेचे अंदाजपत्रक सादर! 'सोपो' गोळा करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ; 36 कोटी उत्पन्न

Ponda Municipal Council budget: ८० टक्के वसुली करण्यात आली असून यापूर्वी एवढ्या टक्क्यांनी अशाप्रकारची वसुली राज्यातील कोणत्याही पालिकेने केलेली नाही.

Sameer Panditrao

फोंडा: फोंडा पालिकेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत पालिकेचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. ३६ कोटी १० लाख ४४ हजार ९०० रुपयांचे हे शिलकी अंदाजपत्रक सादर करताना पालिका क्षेत्रातील विकासावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

पालिकेच्या सोपो कराची मुदत संपत असल्याने सध्या आहे त्याच कंत्राटदाराला सोपो कर गोळा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष आनंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला नगरसेवक तसेच पालिका अधिकारी उपस्थित होते.

पालिकेचे यंदाचे अंदाजपत्रक शिलकी दाखवण्यात आले आहे. ३६ कोटीपेक्षा जास्त रकमेचे उत्पन्न तर ३५ कोटी ९४ लाख रुपयांचा खर्च त्यात दाखवण्यात आला आहे. एकंदरित या शिलकी रकमेच्या अंदाजपत्रकात विकासकामांबरोबरच इतर खर्चाचेही प्रयोजन करण्यात आले आहे.

फोंडा पालिकेच्या सोपो कराची मुदत या महिन्यात संपत असून नवीन सोपो कराची पावणी घेण्यासाठी अजूनपर्यंत कुणीही आले नसल्याने शेवटी आहे त्याच कंत्राटदाराला तीन महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. बैठकीत दोनच विषय आले व त्यावर सांगोपांग चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात आले.

फोंडा पालिका क्षेत्रातील घरपट्टीच्या रुपात १ कोटी ६० लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. ८० टक्के वसुली करण्यात आली असून यापूर्वी एवढ्या टक्क्यांनी अशाप्रकारची वसुली राज्यातील कोणत्याही पालिकेने केलेली नाही. याशिवाय दुकानांचे भाडे वसुलीही चांगली झाली असून २ कोटी ३३ लाख रुपयांची वसुली झाल्यामुळे पालिकेच्या गंगाजळीत भरघोस वाढ झाली आहे.

‘सोपो’चे केवळ सात हजार!

फोंडा पालिका कर्मचाऱ्यांकडून सोपो कर गोळा करण्यात आला होता, मात्र केवळ सात ते आठ हजारच प्रतीदिन उत्पन्न त्यावेळी मिळाले. मात्र कंत्राटदाराला जेव्हा हे सोपो कराचे कंत्राट देण्यात आले, तेव्हा सोळा हजार रुपयांवर हा आकडा गेला. पालिका कर्मचाऱ्यांकडून कमी उत्पन्न मिळाल्यामुळे शेवटी आहे त्याच कंत्राटदाराला हे सोपो कराचे कंत्राट देण्यात आले असल्‍याची माहिती नगराध्यक्षानी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT