lights  Dainik Gomantak
गोवा

Ponda News : वादळी वाऱ्यामुळे फोंड्यात वीजसमस्या; वीज खात्याच्या तत्परतेमुळे पुरवठा सुरळीत

Ponda News : एरव्ही तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात वीज खात्याला यश मिळाले असून कुर्टी-फोंडा वीज केंद्रावर बसवण्यात आलेला ६३ एमव्हीए वीज ट्रान्स्फॉर्मर पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर ही समस्या कायमची निकाली निघणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News :

फोंडा, सध्याच्या अवकाळी पाऊस आणि वादळी वारा यामुळे फोंडा तालुक्याला खंडित वीजपुरवठ्याची समस्या सतावत आहे.

एरव्ही तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात वीज खात्याला यश मिळाले असून कुर्टी-फोंडा वीज केंद्रावर बसवण्यात आलेला ६३ एमव्हीए वीज ट्रान्स्फॉर्मर पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर ही समस्या कायमची निकाली निघणार आहे.

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका फोंड्यालाही बसत असल्याने वीजपुरवठ्याची समस्या उद्भवत आहे. पण वीज खात्याच्या तत्परतेमुळे हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले जात असल्याने खंडित वीजपुरवठ्याची समस्या तेवढी भेडसावत नसल्याच्या प्रतिक्रिया वीज ग्राहकांकडून येत आहेत.

सध्या कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे वीजपुरवठ्याची समस्या जटील झाली आहे. पडणारी झाडे आणि वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा बंद करावा लागतो, त्यामुळे ग्राहकांना थोडा त्रास सहन करावा लागतो, असे या खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. खात्याचा कर्मचारी वर्ग वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्पर असल्याने खंडित झालेला पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

फोंड्यातून व्हायचा वीजपुरवठा

साधारण चाळीस वर्षांपूर्वी राज्याला कुर्टी-फोंडा वीज केंद्रातून वीजपुरवठा केला जायचा. पण नंतरच्या काळात वाढलेले निवासी प्रकल्प, औद्योगिक वसाहतींची निर्मिती यामुळे राज्यात वीजपुरवठ्याची मागणी वाढल्याने विविध ठिकाणी वीज केंद्रे उभारण्यात आली. पूर्वीच्या काळी मर्यादित स्वरूपात वीजपुरवठा असायचा; पण आता गरज वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

धक्‍क्‍यांच्‍या विस्‍ताराचा प्रस्‍ताव नाही! 'एमपीए'चे 'एनजीटी'ला पत्र; 11 दशलक्ष टनांपर्यंतच कोळसा हाताळणी

SCROLL FOR NEXT