South Goa MP Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

फोंडा आयडी रुग्णालयात आरोग्य सुविधांची वणवा; सावंत सरकार इव्हेंटमध्ये दंग! काँग्रेसचा घणाघात

Congress slams Sawant govt: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री मडकईकर यांना आरोग्य सेवेतील त्रुटी काय ते आम्हाला स्पष्टपणे कळू द्या.

Manish Jadhav

राज्यात आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यास सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून आरोग्यमंत्र्यांच्या घोषणा हवेत विरत असतानाच मुख्यमंत्र्यांकडून कर्ज काढून मोठे इव्हेंट केले जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळातील गैरसोयींवर बोट ठेवताना केला.

काँग्रेस पक्षाचे दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, प्रदेश काँग्रेसाध्यक्ष अमित पाटकर, फोंड्याचे काँग्रेस नेते राजेश वेरेकर तसेच काँग्रेस पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी आज या इस्पितळाची पाहणी करून वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री मडकईकर यांना जाब विचारला.

फोंडा तालुक्यातील लोकांच्या आरोग्यासाठी पुरेसा डॉक्टर वर्ग, सीटी स्कॅन, रक्तपेढी आणि महत्त्वाचे म्हणजे शस्त्रक्रिया करणारा डॉक्टरच गेले दीड वर्ष या इस्पितळात नाही, असे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री मडकईकर यांना आरोग्य सेवेतील त्रुटी काय ते आम्हाला स्पष्टपणे कळू द्या, असे सांगत लोकांना प्रत्येकवेळी बांबोळीला पाठवणे योग्य नसल्याचे नमूद केले. काँग्रेस पक्ष राज्यातील विविध समस्यांप्रती आक्रमक असून गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

SCROLL FOR NEXT