Arrest Dainik gomantak
गोवा

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

Goa Crime News: पहिल्या सहिनंतर तरुण आणि पीडित मुलगी यांच्यात शारीरिक संबध झाले. पण, दुसऱ्या सहिनंतर मुलाने लग्नास नकार दिला.

Pramod Yadav

Goa Crime News

फोंडा: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना फोंडा, गोवा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला गुरुवारी रात्री अटक केली. लग्नाचे आमिष देऊन तरुण पीडित मुलीच्या संपर्कात आला, त्यानंतर संशयिताने लग्नास नकार दिला.

दिव्येश संतोष चोडणकर (वय . २२, रा. फोंडा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाने मुलीला लग्नाचे आमिष दिले. दोघांमधील लग्नाची कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली. दोघांच्या दोन सह्या देखील झाल्या. पहिल्या सहिनंतर तरुण आणि पीडित मुलगी यांच्यात शारीरिक संबध झाले. पण, दुसऱ्या सहिनंतर मुलाने लग्नास नकार दिला.

तरुणाने घटस्फोट घ्यायचा आहे असे सांगितल्याने पीडित मुलीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. फोंडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंद करुन गुरुवारी रात्री तरुणाला अटक केली. याप्रकरणी फोंडा पोलिस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, गोव्यात गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीचे विविध प्रकार उघडकीस येत आहेत. कॅश फॉर जॉब घोटाळा गेल्या एक महिन्यापासून गाजत असताना, गेल्या दोन दिवसांत जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. त्यानंतर आता लग्नाच्या आमिषाने फसवणूक करुन लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलीय. पण, पोलिसांनी तात्काळ तरुणाला अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT