Goa Hit And Run Case 
गोवा

Goa Hit And Run Case: चालत घरी जाताना भरधाव ट्रकने चिरडले, फरार चालकाला अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Hit And Run Case

राज्यात अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. बेदरकारपणे वाहने हाकल्याने अनेकांचे जीव जात आहेत. खांडेपार मोले महामार्गावर पार - उसगाव येथे आज अवजड ट्रकने चिरडल्याने एक जण जागीच ठार झाला. हा अपघात एवढा भयानक होता की, मृताच्या शरीराचा चेंदामेंदा झाला, तर डोके ट्रकला अडकून सुमारे शंभर मीटर दूर पडले.

अपघात होताच चालकाने ट्रकसह घटनास्थळाहून पोबारा केला. मात्र, पोलिसांनी चालकाला ट्रकसह पकडले असता त्याला अपघात झाल्याचे माहीतच नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. अपघात झाला त्यावेळेला पाऊस पडत होता, अशी माहिती संशयित ट्रक चालकाने दिली.

मृताची उशिरा ओळख पटवण्यात आली असून आनंद धर्मा नाईक (वय ५७) असे त्यांचे नाव आहे. ते स्थानिक रहिवासी होते. खुरसाकडे पार उसगाव येथे त्यांचे घर. दुपारी चालत घरी जात असताना हा अपघात झाला.

अपघातग्रस्त आरजे २७ जीबी २१२४ या क्रमांकाचा ट्रक दहा चाकी असून त्याला धारबांदोडा येथे पकडण्यात आले. हा ट्रक कुर्टी - फोंड्याहून मोलेच्या दिशेने जात होता. पोलिसांनी मृतदेह चिकित्सेसाठी इस्पितळात पाठवला असून पुढील चौकशी सुरू आहे.

पादचाऱ्याला धडक, ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा

बेदरकारपणे ट्रक चालवून नावेली येथे एका पादचाऱ्याला जखमी केल्याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध मडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवार, १७ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मडगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक नीलेश शिरोडकर यांनी तक्रार दाखल केली आहे.

कर्नाटकात नोंदणीकृत असलेल्या ट्रकचालकाने बेदरकारपणे ट्रक चालवून मांडोप-नावेली येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीला धडक दिली. त्यामुळे त्या व्यक्तीच्या डाव्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी व्यक्तीवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. ट्रकचालकावर भादंसंच्या २७९ आणि ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT