Medicine  Dainik Gomantak
गोवा

अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक विक्रीच्या नोंदींत फेरफार; फोंडा येथील फार्मसीचा परवाना निलंबित

FDA Goa: गोव्यात २०२४ -२५ दरम्यान गोळा करण्यात आलेल्या १,२६९ नमून्यांमध्ये संशयास्पद पदार्थ किंवा भेसळ आढळली नसल्याचे एफडीएकडून स्पष्ट.

Pramod Yadav

पणजी: अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक विक्रीच्या नोंदींत फेरफार केल्यामुळे फोंडा येथील फार्मसीचा परवाना एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आला आहे. तसेच, औषध विक्रीची व्यवस्थित नोंद योग्यरित्या न ठेवल्यामुळे मडगाव येथील एका फार्मासिस्टचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनाकडून एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आला आहे.

2024 ते 2025 या काळात अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने १,२६९ नमूने गोळा करण्यात आले होते. यापैकी एकातही संशयास्पद पदार्थ किंवा भेसळ नसल्याचे आढळून आले आहे. अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली आहे.

एफडीएने ७०३ ठिकाणी तपासणी करुन १,२६९ नमूने गोळा करण्यात आले होते. गुणवत्ता तपासणीसाठी राज्यातील औषध विक्रेते, उत्पादक, घाऊक विक्रेते, सरकारी रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक या ठिकाणांवरुन हे नमूने गोळा करण्यात आले होते. तपासणीनंतर या नमून्यामंध्ये कोणताही संशयास्पद पदार्थ किंवा भेसळ आढळून आली नसल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

गोवा भारतातील औषध निर्मितीचे महत्वाचे केंद्र आहे. राज्यात उत्पादन केलेली औषधे अमेरिका, युके यासह विविध देशांमध्ये निर्यात केली जातात. २०१४ ते २०१५ या काळात गोव्यासह देशभरातून ५०,००० नमूने गोळा करण्यात आले होते. त्यावेळी देखील राज्यात औषधांमध्ये भेसळ आढळून आली नव्हती, अशी माहिती एफडीएने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT