Goa Dengue Cases Dainik Gomantak
गोवा

Ponda News: फोंडा तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण वाढले; सतर्कतेचा इशारा

सर्वाधिक रुग्ण परप्रांतीय

दैनिक गोमन्तक

Ponda News: फोंडा तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण वाढले असल्याने पालिका तसेच पंचायत पातळीवर सतर्कता बाळगण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. तालुक्यात विविध आरोग्य केंद्रातील आकडेवारीनुसार गेल्या ऑगस्ट महिन्यात एकूण ४४ रुग्णांची नोंद झाली आहे. डेंग्यू रुग्णांत सर्वाधिक रुग्ण हे परप्रांतीय आहेत.

फोंडा उपजिल्हाधिकाऱ्यांनी यासंबधीची सूचना पालिका, पंचायत तसेच औद्योगिक आस्थापनांना दिली आहे. फोंडा तालुक्यात सध्या सर्वाधिक रुग्ण हे मडकई आरोग्य केंद्रात नोंद झाले आहेत, तर सर्वात कमी रुग्ण शिरोडा केंद्रात सापडले आहेत.

आरोग्य खात्याने डेंग्यू रुग्ण वाढीला आळा घालण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, पावसाचे पाणी, विहिरींची अस्वच्छता व पाण्याच्या टाक्यांमुळे डास पैदास वाढल्याचे समोर आले आहे.

फोंडा उपजिल्हाधिकारी सुयश खांडेपारकर यांनी घेतलेल्या बैठकीत आवश्यक सूचना केल्या असून या बैठकीला गोवा कॅनचे रोलंड मार्टिन्स, आरोग्याधिकारी डॉ. स्मिता पार्सेकर तसेच स्वच्छता विभागाचे मनोज नाईक उपस्थित होते.

यावेळी फोंडा तालुक्यातील विहिरी तसेच पाण्याच्या टाक्यांची पाहणी करण्याबरोबरच पालिका व पंचायत पातळीवर जागृती व इतर उपक्रम हाती घेण्यासंबंधी चर्चा झाली.

डेंग्यूचे रुग्ण

मडकई - १९

बेतकी खांडोळा - १५

फोंडा - ७

शिरोडा - ३

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT