Court Decision  Dainik Gomantak
गोवा

Ponda Crime: तरुणीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या पंचायत सचिवाला अंतरिम जामीन मंजूर

Ponda Usgao Crime: या प्रकरणाची पुढील सुनावणी आता दि. २१ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता होईल

Akshata Chhatre

फोंडा: उसगाव ग्रामपंचायतीचे सचिव होनाजी अनिल मोरजकर (वय ५५ वर्षे) याच्याविरुद्ध एका युवतीने विनयभंगाची तक्रार फोंडा पोलिसांत मंगळवारी (१४ जानेवारी) दाखल करण्यात आली होती. यानंतर सचिवांनी केलेल्या अटकपूर्व जमिनीवर न्यायालयीन सुनावणी झाली असून त्याचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता दि. २१ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता होईल.

सत्तरी भागातील ही युवती सर्व्हेअर म्हणून कंत्राटी तत्त्वावर उसगाव पंचायतीत कामाला होती आणि कामाच्या निमित्ताने सचिवाने विनयभंग केल्याची तक्रार या युवतीने केली आहे. उसगाव - गांजेच्या पंचसदस्य मनीषा उसगावकर यांच्या सहकार्याने पीडित युवतीने ही तक्रार दाखल केली असून त्यात पंचायत सचिवाने या युवतीच्या मोबाईलवर पाठविलेले मेसेजही जोडले आहेत.

अटक चुकवण्यासाठी ग्रामपंचायतीचे सचिव होनाजी अनिल मोरजकर याने फोंडा प्रथम वर्ग न्यायालयात अर्ज दाखल केला होता, ज्याला न्यायालयाची परवानगी मिळाली असल्याने त्याची अंतरिम जमिनीच्या बळावर सुटका झाली आहे.

सध्या होनाजी मोरजकर याच्या अनुपस्थितीत ग्रामपंचायतीचा ताबा तिवरे- वरगाव पंचायतीचे सचिव मयूर कुडाळकर यांच्याकडे सोपवण्यात आलाय.

१५ ऑक्टोबरला या युवतीला फिल्ड सर्व्हेअरचे काम बंद करून कार्यालयीन कामासाठी बोलावण्या आले. त्याचा फायदा घेत पंचायत सचिव होनाजी मोरजकर याने मोबाईलवर अश्‍लिल मेसेज पाठवायला सुरुवात केली, तसेच विनयभंग केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या युवतीने काम सोडले असून फोंडा पोलिस स्थानकात याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT