Ponda Dainik Gomantak
गोवा

Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

Ponda News : नदीवरील बंधाऱ्याच्या प्लेट्‌स काढण्याचा करतात प्रयत्न

गोमन्तक डिजिटल टीम

एकनाथ खेडेकर

Ponda News :

फोंडा, धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील ताकार-दावकोण, दाभाळ येथील दूधसागर नदीवरील बंधाऱ्याजवळ वारंवार देशी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी अनेकजण येतात आणि दारू ढोसून मस्ती करतात.

गेल्या रविवारी दारूच्या नशेत आंघोळ करण्यासाठी आलेल्या काहीजणांनी बंधाऱ्याच्या प्लेट्स काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यावरून वाद निर्माण झाला.

याविषयी स्थानिक लोकांनी जाब विचारल्यानंतर ते मद्यधुंद पर्यटक दादागिरी करू लागले. नंतर स्थानिकांनी पोलिसांना बोलावणार असे सांगितल्यानंतर आंघोळीसाठी आलेल्यांनी तेथून पलायन केले. अशा स्वरूपाची दंगामस्ती करणाऱ्या देशी पर्यटकांमुळे आम्हा स्थानिकांना पुष्कळ त्रास होत आहे. संबंधित पोलिस खात्याने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे. पोलिस व जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांनी पर्यटकांवर कारवाई करावी, अशी मागणी लोकांकडून होत आहे.

ताकार-दावकोण येथील बंधारा सध्या पर्यटकासाठी आकर्षण बनला आहे. उष्णतेपासून दिलासा मिळविण्यासाठी पणजी, फोंडा, मडगाव, वास्को, सावर्डे, साखळी व अन्य भागातील पर्यटक नदीवर आंघोळीसाठी येत आहेत. अशा लोकांना येथील पाण्याचा अंदाज न आल्यास ते बुडण्याची शक्यता स्थानिक लोक व्यक्त करीत आहेत.

गेल्या रविवारी दिवसभर देशी पर्यटकांची धबधब्यावर गर्दी दिसून आली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा देशी पर्यटकांनी आंघोळीसाठी गर्दी केली. आंघोळ करताना बांधऱ्याच्या प्लेट्‌स काढण्यात येत असल्याने जलस्रोत खात्याने याची दखल घ्यावी, अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे.

सरकारी मालमत्तेचे नुकसान करू नये!

१ दूधसागर नदीवर एकूण १३ बंधारे आहेत. ओपा प्रकल्पाला पाणी जसे कमी होत जाते त्याप्रमाणे पाणी सोडण्यासाठी आम्ही बंधाऱ्याच्या प्लेट्स काढीत असतो. मात्र, बंधाऱ्याजवळ काही देशी पर्यटक व गोवा राज्यातील काही भागातील लोक आंघोळीसाठी येतात.

२ हे लोक त्या प्लेट्सवर दगड मारून त्या फोडतात. प्लेट्स काढून टाकतात, अशा तक्रारी आल्या आहेत. आम्ही याची दखल घेऊन पोलिस तक्रार करणार आहोत. आंघोळीसाठी येणाऱ्या लोकांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान करू नये, असे आवाहनही साहाय्यक अभियंता सदानंद नाईक यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT