problem of traffic jams in ponda persists Dainik Gomantak
गोवा

Ponda: फोंड्यात वाहतूकीचा बोजवारा; पालिकेत राखीव जागा असून रस्त्यावरच पार्किंग, नागरिकांची कुचंबणा

Ponda Traffic: फोंडा बाजार हा शहराचा महत्त्वाचा भाग असून येथे नेहमीच वर्दळ असते. त्यातच वाहने रस्त्यावरच पार्क करून जाणाऱ्या बेशिस्त नागरिकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे.

Sameer Panditrao

Ponda Traffic Issues

फोंडा: फोंडा बाजार हा शहराचा महत्त्वाचा भाग असून येथे नेहमीच वर्दळ असते. त्यातच वाहने रस्त्यावरच पार्क करून जाणाऱ्या बेशिस्त नागरिकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. वास्तविक पालिका इमारतीच्या तळघरात पार्किंगसाठी एैसपैस जागा केली असूनही लोक रस्त्यावरच वाहने उभी करताना दिसतात.

प्रभू टॉवर्स ते शांतीनगर जंक्शन या रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्यामुळे बऱ्याच वेळा वाहतूक कोंडी होताना दिसते. हा रस्ता अरुंद असल्यामुळे तिथे एखादे वाहन जरी पार्क केले तरी वाहतूक कोंडी होते.

त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या आढळून येतात. यामुळे बऱ्याच वेळा वाहनचालकात ‘तू-तू मै-मै’चे प्रकार घडताना दिसतात. हल्लीच बेकायदा पार्क केलेल्या एका वाहनचालकात आणि घरमालकात खडाजंगी झाली होती. वाहतूक पोलिसांनी हस्तक्षेप केला नसता तर हे प्रकरण चिघळले असते. ‘तालांव’ देऊनही बेकायदेशीर पार्किंगचे प्रकार थांबत नसल्यामुळे हा प्रश्न अधिकच बिकट बनला आहे. आता फोंडा पालिकेने काही ठिकाणी पे-पार्किंग करायचे ठरविले असले तरी ते किती यशस्वी होते, हे बघावे लागेल. पालिकेने पार्किंगसाठी जिथे जागा राखून ठेवल्या आहेत, तिथेच वाहने पार्क करा, असे आवाहन कृषिमंत्री रवी नाईक यांनी केले आहे.

वाहतूक पोलिस दक्ष पण...

फोंड्याचे वाहतूक पोलिस दक्ष झाले असून ते बेकायदा वाहने उभी करणाऱ्यांवर कडक कारवाई करताना दिसतात. खास करून वाहतूक पोलिस उपनिरीक्षक आदित्य नाईक गावकर आणि हवालदार किशोर मोरे यांनी बेकायदेशीर पार्किंगचा मेसेज मिळताच ताबडतोब कृती करण्याची मोहीम आखली असून वाहनचालकांवर वचक बसविला आहे. पण तरीही पोलिसांची कुमक कमी पडत असल्यामुळे बेशिस्त वाहनचालकांचे फावते.

सीसीटीव्ही कॅमेरे हवेत

शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे. त्यामुळे बेकायदेशीर पार्किंग केलेल्या वाहनांचे क्रमांक मिळू शकतील. आता फोंडा बाजारात प्रभू टॉवर्सजवळ पालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे ठरविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT