Konkani Drama Competition
Konkani Drama Competition  Dainik Gomantak
गोवा

Konkani Drama Competition : कला अकादमीची कोकणी नाट्यस्पर्धा आजपासून फोंड्यात; उत्साह शिगेला

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

Konkani Drama Competition : फोंडा, आज १२ फेब्रूवारीपासून फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात कला अकादमीच्या कोंकणी नाट्यस्पर्धा सुरू होत असून यंदा स्पर्धेत ३१ संस्था असल्यामुळे तीव्र चुरस होणार हे निश्‍चित आहे.

कला अकादमीची कोंकणी नाट्यस्पर्धा ही कोंकणी रंगभूमीच्या दृष्टीने एक महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. दरवर्षी साधारणपणे २० ते २२ संस्था या स्पर्धेत भाग घेत असतात.

पण यंदा स्पर्धेने उच्चांक गाठला असून सध्यातरी या स्पर्धेत ३१ संस्था असल्याचे दिसत आहे. यात प्रथितयश संस्थाबरोबर नवोदित संस्थांचाही सहभाग आहे.

रुद्रेश्‍वर पणजी, कलाशुक्लेंदू पणजी, अथश्री फोंडा, नागेश महालक्ष्मी, प्रासादिक नाट्य बांदिवडे, अंत्रूज घुडयो बांदोडे, भांगराळे गोंय अस्मितासारख्या नाट्यक्षेत्रातील प्रख्यात नाट्यसंस्थांबरोबर काही नवोदित संस्थांनीही या स्पर्धेत भाग घेतला आहे.

या स्पर्धेची सुरुवात आज ‘कन्यादान’ या रुद्रेश्‍वर पणजी यांच्या नाटकाने होणार आहे. स्पर्धेकरिता खास लिहिल्या गेलेल्या नाटकाबरोबरच बरीच अनुवादित नाटके ही या स्पर्धेत सादर होणार आहेत. स्पर्धेतील उच्चांकी संख्येमुळे सध्या कोंकणी नाट्यक्षेत्रात उमेदीचे वातावरण दिसत असून याची परिणती काय होते याकडे गोमंतकीय नाट्यरसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

संख्या जरी उच्चांकी असली तरी दर्जा राखणे हे मात्र पूर्णपणे संस्थाच्या हातात असणार आहे. नाहीतर फक्त संख्या मोठी आणि दर्जा कमी,असे झाल्यास ‘खोदा पहाड निकला चूहा’ असे म्हणण्याची पाळी नाट्यरसिकांवर येऊ शकते.

कोणाला बक्षीस मिळाले यापेक्षा स्पर्धेतील सादरीकरण महत्त्वाचे ठरणार आहे आणि हाच निकष रसिकांच्या दृष्टीने महत्वाचा राहणार आहे.

एकंदरीत आजपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेकडे फक्त नाट्यसंस्थांचेच नव्हे तर नाटकांवर प्रेम करणाऱ्या रसिकांचे लक्ष लागून राहिले असून यामुळे स्पर्धेतला प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. या ‘सागर मंथनातून हाताला काय लागते’ हे स्पर्धा झाल्यानंतरच कळून येईल.

फोंडा तालुक्यातील १० संस्थांचा सहभाग

फोंडा तालुक्यातील तब्बल दहा संस्था या स्पर्धेत उतरणार असल्यामुळे एकूण स्पर्धेच्या एक तृतीयांश भाग हा फोंडा तालुक्यातील संस्थांनी व्यापल्याचे दिसत आहे.

त्यामुळे सध्या फोंडा तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून गावागावात रंगीत तालमी सुरू असल्याचे दृश्‍य बघायला मिळत आहे. यावेळी बऱ्याच संस्था स्पर्धेत असल्यामुळे ‘कॉंटे की टक्कर’ होणार हे आताच अधोरेखित होऊ लागले आहे. यामुळे स्पर्धकांबरोबर परीक्षकांचाही कस लागणार असून डावे उजवे करताना बरेच लक्ष द्यावे लागणार, असे दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT