Ponda And Sanquelim Municipal Council 2023 Dainik Gomantak
गोवा

Ponda-Sanquelim Election Voting: साखळी, फोंडा येथे चुरशीने मतदान; जाणून घ्या मतदानाची अंतिम आकडेवारी

मतमोजणी 7 मे रोजी

गोमंतक ऑनलाईन टीम

Ponda-Sanquelim Council Election 2023 Voting: साखळी आणि फोंडा येथे नगरपालिकांसाठी आज, शुक्रवारी (5 मे) मतदान पार पडले. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची मुदत होती. साखळीमध्ये एकूण 87.56 टक्के तर फोंडा नगरपालिकेसाठी एकूण 74.66 टक्के मतदान झाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातील नगरपालिका असल्याने साखळी आणि कृषी मंत्री रवी नाईक यांच्या मतदारसंघातील नगरपालिका असल्याने फोंडा या दोन्ही ठिकाणी मतदानासाठी चुरस पाहायला मिळाली. दरम्यान, दोन्ही नगरपालिकांसाठीची मतमोजणी रविवारी 7 मे रोजी आहे.

सायंकाळी चार ते पाच हा अखेरचा तास कोरोनाची बाधा झालेल्या मतदारांसाठी राखीव होता. साखळी नगरपालिकेत एकूण 12 जागा असून त्यापैकी 2 जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. तर फोंडा नगरपालिकेत 15 जागा असून तिथेही दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे साखळीतील 10 आणि फोंड्यातील 13 अशा एकूण 23 जागांसाठी मतदान पार पडले.

साखळीत दहा तर फोंड्यात बावीस मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी सर्व केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त होता. साखळीत दहा प्रभांगांमध्ये एकूण 31 उमेदवार रिंगणात होते. तर फोंड्यात 13 प्रभागांत मिळून 43 उमेदवार रिंगणात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT