Accident Dainik Gomantak
गोवा

Ponda Accident : तीन अपघातांत तीन ठार; कुर्टी, पंचवाडी, पेडणे भागातील दुर्घटना

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda Accident :

फोंडा अपघातांचे सत्र सुरूच असून नागरिकांचे बळी जाण्याचे दुष्टचक्र थांबता थांबेना अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या ना त्या कारणाने राज्यात अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. त्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे, चालकाचा निष्काळजीपणा आणि धूम स्टाईलची क्रेझ या प्रमुख कारणांचा समावेश आहे. आज कुर्टी, पंचवाडी, पेडणे येथे तीन ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांत तिघांचे बळी जाण्याची दुर्घटना घडली आहे.

पंचवाडी - शिरोडा येथे शुक्रवारी सकाळी एका टँकरने ट्रक व कारला धडक देऊन झालेल्या झालेल्या विचित्र अपघातात टँकरमधील तिघांपैकी हसन अब्बास शिलेदार (वय ४२, आनंदवाडी - सावर्डे) हा ठार झाला. जीए - ०१ - झेड - १३०५ या क्रमांच्या टँकरची धडक समोरून जाणाऱ्या जीए - ०९ - यू - ३६४६ या क्रमांकाच्या खडीवाहू ट्रकच्या टायरला बसल्यानंतर समोरून येणाऱ्या जीए - ११ - सी - ४५८३ क्रमांकाच्या टुरिस्ट टॅक्सीला बसली. या विचित्र अपघातात पाणीवाहू टँकर रस्त्यावर उलटा झाला, त्यात टँकरमधील तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. कारमधील वरून चंद्रावती कोरगावकर (वय ७०, पेडणे) ही महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. फोंडा पोलिस या अपघातप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

हसन अपघातस्थळी रक्ताच्या थारोळ्यात

ट्रक, कारला धडक देऊन पाणीवाहू टँकर उलटल्याने त्यात तिघेजण अडकले. त्यापैकी हसन अब्बास शिलेदार हा ठार झाला, तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले. टँकरमध्ये हसन रक्ताच्या थारोळ्यात अडकून पडला होता. त्याला शिरोडा सरकारी इस्पितळात नेण्यात आले, पण तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तो सावर्डेतील एका गॅरेजमध्ये कामाला होता. टँकर भर रस्त्यावर उलटल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT