Sal River
Sal River  Dainik Gomantak
गोवा

सांडपाण्यामुळे साळ नदी प्रदूषित, मासळी शेतीवर परिणाम

दैनिक गोमन्तक

सासष्टी: सासष्टी (Salcete) तालुक्यात पाण्याचा स्त्रोत असणारी साळ नदी महत्वाचा घटक आहे. साळ नदीच्या (Sal River) परिसरात अनेक पारंपारीक मच्छीमार (Fisherman) गेल्या अनेक वर्षांपासुन मासळी शेती करत आहे. मात्र सद्या साळ नदीत सांडपाणी मिसळल्यामुळे प्रदूषित झाली आहे. आणि त्याचा परिणाम मासळी उत्पादनावर होत आहे. काही मच्छीमारांनी आपला धंदा बंद केला आहे शिवाय काही व्यक्ती धंदा बंद करण्याच्या वाटेवर आहेत.  मासळी शेतीमुळे भरपूर कोळंबीचे उत्पादन होत परंतु कोळंबीबरोबर इतर प्रकारच्या मासळी उत्पादनावरही मोठा परिणाम झाला आहे. या मच्छीमाऱ्यांनी सरकारी अधिकारी व संबंधीत अधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब घातली आहे. तक्रारीही दाखल केल्या आहेत. परंतु त्यांनी सांडपाणी नेमके कुठून व कशाप्रकारे साळ नदीच्या पात्रात मिसळले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नसल्याचे समोर आले नसल्याची तक्रार या पारंपारीक मच्छीमाऱ्यांनी केली आहे. 

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्ड व जिल्हा प्रशासनाने या तक्रारीचे निरसन करण्याची गंभीरता दाखवलेली नाही. साळ नदीतील प्रदूषीत पाणी आता या मासळी शेतात येत असल्याने कोळंबी उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम होताना दिसत आहे. आम्हाला आमचा धंदा बंद करावा लागणार असल्याचे एका मासळी शेतकऱ्याने सांगितले. याचा परिणाम असोळणा व बेतूल येथील मच्छिमारांवरही होताना दिसत आहे. सांडपाण्यामुळे नदीचे पाणी प्रदूषीत झाले आहे, त्याचबरोबर मासळी आणण्यासाठी ज्या बोटींचा वापर जास्त प्रमाणात केला जात आहे त्यातील ऑईल (तेल), रसायनिक द्रव्य पाण्यात मिसळत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची मासळी मिळणे बंद झाले असल्याचे रेमेदीन क्रास्तो यांनी सांगितले.

शिवाय, आमच्या सारख्या मच्छिमाऱ्यांना मासळी आणण्यासाठी होडी किंवा पनेळ नेणे कठीण होत आहे. नदीच्या पात्रात कचरापण साठलेला आहे. खारेबांद येथील सिवेज प्लांट बंद असल्याने त्याचा परिणाम मासऴी उत्पादन व मिळण्यावर होत आहे असे आगुस्तिन्हो फुर्तादो यांनी सांगितले. सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे व आमची समस्या दूर करावी अशी मागणी या मच्छिमाऱ्यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

SCROLL FOR NEXT