Goa MLA Viresh Borkar addressing media over political issue Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: आमदार वीरेश बोरकरने मनोजला दिले आव्हान! संस्थापक सदस्य, समित्य‍ांशी चर्चेअंतीच पुढील निर्णय

Viresh Borkar Challenges Manoj Parab: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षात (आरजीपी) अंतर्गत वादाचा स्फोट झालेला असतानाच आता आमदार वीरेश बोरकर यांनी पक्षाचे अध्यक्ष मनोज परब य‍ांना आव्‍हान दिले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षात (आरजीपी) अंतर्गत वादाचा स्फोट झालेला असतानाच आता आमदार वीरेश बोरकर यांनी पक्षाचे अध्यक्ष मनोज परब य‍ांना आव्‍हान दिले आहे. पक्षाची केंद्रीय कार्यकारिणी अंतिम नसते. त्यामुळे पक्षाचे संस्थापक सदस्य, राज्यभरातील पदाधिकारी आणि सर्व गटांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी बुधवारी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

‘मी अजूनही गोव्याबाहेर आहे. पक्षात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे कार्यकर्ते निराश झाले आहेत. पक्षाची केंद्रीय कार्यकारिणी अंतिम नसते. आरजीपी घडवण्यासाठी राज्यभरातील अनेक कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्या सर्वांशी चर्चा करणे मला महत्त्वाचे वाटते. गोव्यात परतल्यानंतर मी त्या सर्वांशी चर्चा करेन आणि त्यानंतर माझा निर्णय केंद्रीय कार्यकारिणीला कळवेन’, असे बोरकर म्हणाले.

‘आरजीपीचा आमदार या नात्याने विधानसभा सभागृहात मी संपूर्ण राज्यातील जनतेच्या प्रश्नांबाबत भांडत आहे. नगरनियोजन कायद्याच्या कलम ‘३९ अ’सोबतच इतर अनेक प्रश्नांवरून मी सत्ताधाऱ्यांशी लढत आहे. हे सर्व प्रश्न राज्यभर पोहोचणे गरजेचे आहे.

त्यामुळे मला त्याबाबत कार्यकर्त्यांशी बोलूनच पुढील निर्णय घ्यावा लागेल’, असे त्यांनी सांगितले.‘सत्ताधारी भाजपने भ्रष्टाचाराला मोकळी वाट करून दिली आहे. कलम ''३९ अ''द्वारे जमिनींचे रुपांतरण करून त्या परप्रांतीयांना विकल्या जात आहेत. राज्यातील बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे तरुणाई चिंताग्रस्त झाली आहे. असे अनेक प्रश्न, समस्या मला पुढील काळात संपूर्ण गोव्यातील जनतेसमोर घेऊन जायच्या आहेत’, असेही त्यांनी नमूद केले.

‘माझा लढा भाजपला रोखण्यासाठीच’

‘आरजीपी पक्ष‍ाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. माझ्यासोबत अनेकांनी पुढील काळात अथक प्रयत्न करून हा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवला. त्याचा फायदा आम्हाला मिळाला. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीत भ्रष्ट भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आपण लढा सुरू केला आहे. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हा लढा लढण्याचा आणि तो यशस्वी करून दाखवण्याचा आपला निर्धार राहील’, असेही वीरेश बोरकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT