Union Defense Minister Rajnath & Union Minister Nitin Gadkari Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील राजकारण 'या' बड्या नेत्यांच्या एन्ट्रीने ढवळून निघणार

यातच 28 तारखेला देशाचे उपराष्ट्पती एम. व्यंकय्या नायडू येत (M. Venkaiah Naidu) असून ते 1 नोव्हेंबरपर्यंत गोव्यामध्ये असणार आहेत.

दैनिक गोमन्तक

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगूल आत्तापासून वाजू लागले आहे. यातच आता छोट्याशा गोव्यातही विधानसभा निवडणूकांची (Assembly elections Goa) जय्यत तयारी राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजप (BJP) आपल्या पाच वर्षाच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत आहे. तर दुसरीकडे राज्यात प्रमुख पक्ष असणारा कॉंग्रेसदेखील (Congress) भाजपने ज्याप्रकारे कोरोना काळात कामकाजाची हाताळणी केली त्यावरुन निशाणा साधत आहे. तर दुसरीकडे स्थानिक पक्षही भाजप सरकारशी (BJP government) युती करण्यास टाळाटाळ करत आहेत. या पाश्वभूमीवर अनेक पक्षांचे प्रमुख नेते राज्यातील जनतेला रिझविण्यासाठी मोठ- मोठ्या प्रचारसभा घेण्यासाठी गोव्यामध्ये दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाची आणि पोलिस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

यातच 28 तारखेला देशाचे उपराष्ट्पती एम. व्यंकय्या नायडू येत (M. Venkaiah Naidu) असून ते 1 नोव्हेंबरपर्यंत गोव्यामध्ये असणार आहेत. त्याचबरोबर 29 रोजी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ (Union Defense Minister Rajnath) सिंग हे देखील गोव्यात येत असून ते देखील 1 नोव्हेंबरपर्यंत गोव्यात राहून जनतेला आणि आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. शिवाय प्राप्त माहितीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) देखील 30 तारखेला गोव्यामध्ये येणार आहेत. त्यांचा मुक्काम गोव्यात किमान दोन दिवसासांठी असणार असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच हे बडे नेते गोव्यात येत असल्याने पोलिस यंत्रणेची तारांबळ उडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT