Ferry Boat Dainik Gomantak
गोवा

Goa Ferry Boat Service: फेरीबोट शुल्कवाढीला विरोधात राजकीय पक्षही मैदानात

Goa Ferry Boat Service: निर्णय मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन

दैनिक गोमन्तक

Goa Ferry Boat Service: फेरीबोट शुल्कवाढीविरोधात राज्यातील नागरिकांसोबतच आता राजकीय पक्षही आंदोलनाच्या मैदानात उतरले असून सरकारने ही दरवाढ मागे न घेतल्यास काँग्रेस व आम आदमी पक्षाने (आप) तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

काँग्रेस व आपने आज वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने करून फेरीबोट शुल्कवाढीबद्दल सरकारचा निषेध केला.

नदी परिवहन खात्याने फेरीबोटीतील वाहनांच्या शुल्कात वाढ करून सर्वसामान्य गोमंतकीयांवर अन्याय केला आहे. सरकार आता फेरीबोट सेवेतही भ्रष्टाचार करण्याच्या तयारीत आहे, परंतु गोवेकर हे खपवून घेणार नाहीत.

16 नोव्हेंबर रोजी नवीन दरवाढ लागू केल्यास बंदर कप्तान आणि नदी परिवहन खाते बंद पाडू, असा इशारा काँग्रेसने जुने गोवे येथे निदर्शनावेळी दिला, तर राशोल येथे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत सरकारच्या शुल्कवाढीच्या निर्णयाचा निषेध केला व सरकारने ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी केली.

नदी परिवहन खात्याने फेरीबोट शुल्कात दुप्पट वाढ करून सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर घाला घातला आहे. नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी हा निर्णय सरकारचा असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिला.

जुने गोवे येथील फेरी धक्क्याजवळ शुल्कवाढीच्या विरोधात कुंभारजुवे काँग्रेस गट समितीकडून निदर्शन करण्यात आली. त्यात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, एल्टन डिस्कोटा, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, अमरनाथ पणजीकर व इतर सहभागी झाले होते.

सरकारच्या नदी परिवहन खात्याने फेरीबोटीवरील वाहनांसाठी जाहीर केलेली शुल्कवाढ मागे घ्यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

राशोल येथे आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी बोलावलेल्या सभेत सरकारच्या शुल्कवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी क्रुझ सिल्वा, प्रशांत नाईक, गेर्सन गोम्स, राक्यू मस्कारेन्हस, पाऊल लोबो उपस्थित होते.

निर्णय मागे घ्यावा: फेरेरा

प्रवासी आणि दुचाकींसाठी फेरीबोट सेवा मोफत होती. आता शुल्कवाढ लागू केल्यास सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होणार आहे.

दहा हजार वेतन असलेल्यांच्या हातात काहीही शिल्लक राहणार नाही. त्यासाठी सरकारने आताच हा निर्णय मागे घेण्याची गरज आहे, असे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा म्हणाले.

शुल्क लावणे चुकीचे: व्हिएगस

सरकारने सामान्य नागरिकांना महत्त्वपूर्ण सेवांवर शुल्क लावणे चुकीचे आहे. फेरीबोटसेवा मोफत असणे आवश्यक असताना दुचाकी आणि चारचाकीवर शुल्क आकारणी करण्याच्या निर्णयाचा आम्ही निषेध करत असून सरकारने कोणत्याही स्वरूपाचे शुल्क आकारू नये, अशी मागणी आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केली.

‘शुल्क देणार नाही’

सरकारने फेरीबोट शुल्कवाढ जाहीर केली असून याचा फटका आम्हाला बसणार आहे. कारण आम्ही बेटावर राहणारे आहोत. घरी येण्यासाठी आम्हाला फेरीबोटीशिवाय पर्याय नाही.

आम्ही दिवाडीवासी नवीन शुल्क देणार नाही. अनेक वर्षांपूर्वी आम्ही असेच आंदोलन केले होते. आता देखील आंदोलन करण्याची आमची तयारी आहे, असा इशारा दिवाडीवासीयांनी दिला आहे.

पूल नसल्यामुळे जनतेला फेरीबोटीने प्रवास करावा लागतो. हजारो कोटींच्या पुलांचे जिथे शुल्क नाही, तिथे दोन-तीन कोटींच्या फेरीचे शुल्क आकारणे म्हणजे ‘पेनी वाईज पाउंड फुलीश’ धोरण आहे. ३३ आमदारांचे प्रचंड बहुमत आडमार्गाने संपादल्यानंतर सरकारने प्रजेला किंमत द्यायचे बंद केलेय, असाच यातून अर्थ निघतोय.
- राजेंद्र काकोडकर, अर्थतज्‍ज्ञ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT